छोट्या बोटीतून कच्छ ते कन्याकुमारी...

मुंबई - काही जण कयाकिंग फक्त आवड म्हणून करतात. मात्र कौस्तुभ खाडे कयाकिंग करतोय ते फक्त आवड म्हणूनच नव्हे तर सामाजिक जबाबदारी म्हणूनही... 29 वर्षांचा कौस्तुभनं 3 मार्च 2016 रोजी गोवा ते मुंबई हा 500 किलोमीटरचा प्रवास कयाकिंग करून 18 दिवसांत पूर्ण केला होता. हा रेकॉर्ड लिम्का बुकमध्येही नोंद झाला. त्या प्रवासातून मिळालेल्या ऊर्जेतून कौस्तुभ आता कच्छ ते कन्याकुमारी कयाकिंग प्रवासाला निघालाय. शुक्रवारी तो मुंबईत दाखल झाला. कच्छपासून कन्याकुमारीपर्यंतचा टप्पा आहे 3,300 किमीचा. कौस्तुभसोबत त्याची मैत्रीण शांजलीही त्याला साथ देतेय. कौस्तुभ कयाकमधून तर शांजली त्याला सोबत देताना सायकलवरून प्रवास करतेय. मुलांमध्ये खेळांप्रती जागृती निर्माण व्हावी हा हेतू आणि मॅजिक बस या वंचित मुलांसाठी काम करणाऱ्या एनजीओला मदत असा कौस्तुभ आणि शांजलीचा हेतू आहे.

Loading Comments