Advertisement

हे रस्ते एकेकाळी होते मुंबईची शान!


SHARES

मुंबई - मुंबईकरांना मुंबईबद्दल वेगळं काही सांगण्याची गरज नाही. मात्र एकेकाळी मुंबईची एक वेगळीच ओळख होती आणि ती आता कुठेतरी लोप पावत चालली आहे. ग्रँटरोड येथील फॉकलँड रोडवर काही जुने सिनेमागृह होते. त्यांची अवस्था सध्या अत्यंत वाईट आहे. 1920 साली अनेक कलाकार इथे आपली कला सादर करण्यासाठी येत असत. मात्र जसजसा काळ लोटला तसतसा हा विभाग 'रेड लाईट एरिया' म्हणून गणला गेला. या विभागातील काही चित्रपटगृहांची लाईटच जणू काही हरवून गेली. न्यू रोशन, मोती, अलंकार आणि आल्फ्रेड चित्रपटगृह एकेकाळी इथली ओळख होती. 

25 वर्षांनंतर दुरुस्त करण्यात आलेले आणि सध्या खुले असलेले रॉयल ओपेरा हाउस भारतातील जुने सिनेमागृह म्हणून ओळखले जाते. 1932 पासून 1991 पर्यंत प्रत्येक आठवड्यात इथे चित्रपट प्रदर्शित केला गेला. रॉयल ओपेरा हाउसचे उद्घाटन 1911 मध्ये किंग जॉर्ज पाचवे यांच्या हस्ते करण्यात आले. 1991 मध्ये या सिनेमागृहात शेवटचा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. 1991 मध्ये हे सिनेमागृह बंद झालं आणि अखेर कित्येक वर्षांनंतर ऑक्टोबर 2016 मध्ये सिनेमागृह पुन्हा सुरू करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा