Advertisement

तर 'हे' आहे मिलिंद सोमणच्या फिटनेसमागचं गुपित!


तर 'हे' आहे मिलिंद सोमणच्या फिटनेसमागचं गुपित!
SHARES

मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणचा आज ५२ वा वाढदिवस. मिलिंद सोमणला पाहून तो ५२ वर्षांचा आहे, हे सांगता येणं कठीण आहे. या वयातही तो खूप फिट आहे. त्यामुळे नक्की त्याच्या फिटनेसचा काय मूलमंत्र आहे, याचं कोडं सगळ्यांनाच पडलंय.



एका मुलाखतीदरम्यान मिलिंद सोमणनं त्याच्या फिटनेसमागचं गुपित शेअर केलं होतं. खाण्या-पिण्यापासून ते व्यायाम करण्यापर्यंत सर्वच गोष्टी या वेळी मिलिंद सोमणनं शेअर केल्या आहेत.


फिटनेसबद्दल काय बोलला मिलिंद सोमण?

मिलिंद सोमन सकाळी ५ वाजता उठतो. त्यानंतर तो नियमित सकाळी जॉगिंग, सायकलिंग आणि व्यायाम करतो. घरगुती जेवणाला मिलिंद नेहमीच प्राधान्य देतो. चपाती-भाजी आणि डाळ-भात त्यासोबत केळं असा मिलिंदचा रोजचा आहार असतो.



मिलिंद त्याच्या चाहत्यांना नेहमी सांगतो की, बाहेरचं काही खाऊ नका. कारण तुम्ही कोणत्याही मोठ्या रेस्टॉरंटमध्ये खा. पण ते जेवणात काय वापरतात? याची तुम्हाला माहिती नसते.

कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट घेणं मिलिंद टाळतो. सप्टिमेंट घेणं चुकिचं नाही. कधीतरी घेतलेलं चालतं, असं मिलिंदचं मत आहे. पण मिलिंद जास्त करून नैसर्गिक पद्धतीनं फिट राहणं पसंत करतो.



फिट राहण्यासाठी मिलिंद कुठलेच शॉर्टकट्स वापरत नाही. 'शॉर्टकट्स किल यू' असं त्याचं मत आहे. सर्वात पहिलं आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे बाकी सगळं नंतर, असं मिलिंद मानतो. शिवाय मिलिंद सोमण साखर खाण्याच्याऐवजी मध खातो.




हेही वाचा

बिग बींनी घेतली 98 वर्षांच्या चाहतीची भेट!


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा