मालदीव, थायलंडला जाणाऱ्यांसाठी खूशखबर!


SHARE

आता मुंबईतून थायलंड आणि मालदीवला जाणे अधिक सोपे होणार आहे. कारण आतापर्यंत मुंबईतून थेट थायलंडला जाण्यासाठी भारतीय कंपनीचं एकही विमान नव्हतं. मात्र आता पहिल्यांदाच भारतीय विमान कंपनीने मुंबईतून थायलंडमधील फुकेटला जाण्यासाठी थेट विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा दिल्लीतूनही सुरू करण्यात आली आहे.


'गो एयर'ची डायरेक्ट फ्लाइट

8 ऑक्टोबरला 'गो एयर' ही भारतीय विमान कंपनी मुंबईतून फुकेट आणि मालेपर्यंत थेट विमान सेवा सुरू करणार आहे. सुरुवातीला विमानाच्या तिकिटासाठी अत्यंत कमी शुल्क आकारण्यात येईल. त्यामुळे येण्या-जाण्याचा खर्च 17,999 पर्यंत असेल. आतापर्यंत दिल्लीतून मालेला जाण्यासाठी विमान कोच्ची किंवा कोलंबोत थांबत होतं. तेथून पुढे दुसऱ्या विमानाने प्रवास करावा लागत होता. यामुळे प्रवाशांचा 1 ते 2 तास वाया जात होता. मात्र आता प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.


आठवड्यातून 3 दिवस फ्लाइट

मुंबईतून फुकेट आणि मालेसाठी आठवड्यातून तीन दिवस विमान उड्डाण करेल. यानंतर बंगलळुरूतही ही विमान सेवा सुरू करण्याची योजना आहे. यासेवेमुळे गो एयर ही आंतरराष्ट्रीय सेवा देणारी भारतातील पाचवी विमान कंपनी ठरेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या