Advertisement

याला म्हणतात छोटा पॅकेट, बडा धमाका!


SHARES

लहानपणी परीक्षेला जाताना अख्खं पुस्तक वाचून घोटून पक्कं करावं आणि येईल त्या प्रश्नाचं चुटकीसरशी उत्तर द्यावं, असं आपल्याला अनेकदा वाटलं असेल. तसेच, अनेकदा प्रयत्न करूनही पाठांतराचा पाठ कच्चाच राहिल्याने रागाच्या भरात जे काही थोडंफार लक्षात असतं, तेही ऐनवेळी विसरून गेल्याचंही आठवत असेल. अखेर, अनेकांनी घोकंपट्टी नकोच बरं, असं म्हणत पाठांतरापासून दूर पळण्याचाच केला असेल. 

पण, नागपूरच्या गौरीची बातच काही और आहे. हिला म्हणे एकदा शाळेत ऐकलं, शिकलं की पुन्हा पाठांतराची गरजच पडत नाही! गौरी कोडे या अविश्वसनीय मुलीला अख्खी भारतीय राजघटना तोंडपाठ आहे. मुंबई लाइव्हच्या कार्यालयास तिने भेट दिली असता तिच्या टेक्निकचा डेमोही तिने दिला. गोष्टी कशा लक्षात ठेवायच्या यासाठी तिच्या आईनेच दिलेलं बाळकडू तिनं उदाहरणासह समोर मांडलं, तेव्हा आम्हालाही विश्वास ठेवणं भागच पडलं.

राज्यघटना तोंडपाठ करण्यासाठी मी डायमंड टेक्निकचा वापर केला. गोष्टी लक्षात ठेवण्यासाठीची ही एक पद्धत आहे. लहानपणीच आईने मला ही टेक्निक शिकवली. ती पद्धत वापरूनच मी राज्यघटना पाठ केली. आता तर शाळेत काही शिकवलं की त्याची पुन्हा उजळणी करण्याची मला गरजच पडत नाही.
- गौरी कोडे

याच भन्नाट कौशल्यामुळे 12 वर्षांच्या गौरी कोडेला 'गुगल गर्ल' असं म्हणतात. कदाचित, तुमचा विश्वास बसणार नाही, पण तिनं तिच्या याच कौशल्याच्या आधारावर आख्खी राज्यघटना पाठ केली आहे! बापरे! घटनेची 448 कलमं, 25 भाग, 12 परिशिष्ट आणि घटनेच्या निर्मितीपासून झालेल्या 98 घटनादुरुस्ती! हा एवढा सगळा पसारा तोंडपाठ असणं म्हणजे भन्नाटच आहे! 

गौरीला संपूर्ण राज्यघटना तोंडपाठ आहे. विशेष म्हणजे, ती जेव्हा 10 वर्षांची होती, तेव्हा तिने ती तोंडपाठ केली आहे. अवघ्या तीन महिन्यात तिने हे अशक्यप्राय वाटणारं टास्क पूर्ण केलं. यातल्या 52 टक्के कलमांचा तिला अर्थही पूर्ण माहिती आहे. तिच्या याच भन्नाट कौशल्याबद्दल तिची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सने नोंद घेतली आहे.


गुगल गर्लचे मनसे कौतुक



नुकतीच मुंबईत येऊन गौरीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनीही तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती.



हेही वाचा

'टूथब्रश'वर फुटबॉल फिरवून मोहनीशचा विश्वविक्रम

शेफ देवव्रत यांच्या मार्गारीन 'त्रिमूर्ती' शिल्पाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा