चवीचं खा आणि आरोग्यही राखा

 vile parle
चवीचं खा आणि आरोग्यही राखा
vile parle, Mumbai  -  

विले पार्ले - आरोग्य चांगल्या राहण्यासाठी आपला आहारही समतोल असायला हवा, असं म्हटलं जातं. पण, जेवणात जर पोळी-भाजी, वरण-भात असे पदार्थच नेहमी असतील तर अनेक जण नाक मुरडतात. पण, आता समतोल आहार आणि खाद्यपदार्थांत व्हरायटी किंवा नाविन्य, असा पर्यायही उपलब्ध झालाय. त्यासाठी चला विले पार्ले येथील हनुमान रोडवर गार्दे मॅनजर कॅफेत. इथे तुम्हाला ताजं अन्न आणि समतोल आहार मिळेल. इतकंच नाही तर या कॅफेत इटालियन, फ्रेंच आणि लेबनिज खाद्यसंस्कृतीचा आस्वादही घेता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूर्णत: शाकाहारी असलेलं हे कॅफे तुमच्या खिशालाही सहज परवडू शकेल. 

या बातमीचा व्हीडिओ पाहण्यासाठी क्लिक करा- 

https://www.youtube.com/watch?v=Xw1niXyC9cQ

Loading Comments