टॅटूबद्दल बरंच काही...


  • टॅटूबद्दल बरंच काही...
SHARE

मुंबई - तुम्हाला टॅटू काढलाय आवडतो का? असा प्रश्न जर यंग जनरेशला विचारला तर, अनेकांचं उत्तर `हो` असंच येईल. कारण सध्या चलती आहे, टॅटूच्या फॅशनची. `वॉव तुझा टॅटू किती सुंदर दिसतोय,` असं तरुण-तरुणी बोलताना आपण ऐकलंच असेल. पूर्वीच्या काळी टॅटू हे विशिष्ट समाजाच्या संस्कृतीचं प्रतिक म्हणून शरीरावर गोंदवले जायचे. मात्र आता याच टॅटूचं रुपांतर फॅशनमध्ये झालंय. आता टॅटूची क्रेझ एवढी वाढलीय की तुम्हाला कॉलेजमध्ये,प्रवासामध्ये किंवा ऑफिसमध्ये अनेकांच्या अंगावर टॅटू गोंदलेला पाहायला मिळतो. आधी फक्त एखाद्याचं नाव काढणं या पुरताच टॅटू मर्यादित होता. आता टॅटूमध्येही नवनवीन डिझाइन आलेत आणि काढणाऱ्यांची संख्याही वाढू लागलीय. टॅटू काढल्यानंतर जर तो तुम्हाला आवडला नाही तर त्यासाठी तुमच्या समोर दोन पर्याय असतात. एक तर तो टॅटू दुसऱ्या टॅटूनं कव्हर करणं किंवा लेझर ट्रीटमेंट रिमूव्ह करणं शक्य असतं. मात्र लेझरने घालवण्यासाठी खूप खर्च येतो. त्यामुळे सुरुवातीलाच टॅटू निवडताना काळजी घ्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या