Advertisement

महिलांनी साकारली मनमोहक ग्रॅफीटी आर्ट


महिलांनी साकारली मनमोहक ग्रॅफीटी आर्ट
SHARES
Advertisement

पेंटिंगचे प्रकार म्हणजे आजपर्यंत आपल्याकडे फक्त आर्ट गॅलरीमध्ये लावलेल्या चित्रांच्या स्वरूपात आलेले आहेत. आपण चित्र म्हटल्यानंतर एका विशिष्ट फ्रेममध्ये बंदिस्त जागेत काढले गेलेले चित्र अशा स्वरूपाचा विचार करतो. पण चित्र किंवा पेंटिंग हे आर्ट गॅलरीपुरते मर्यादित न राहता रस्त्यावर उतरून भव्य दिव्य प्रमाणात साकार झाले तर? रस्ते, इमारती, घरे, क्रिडांगणाच्या भिंती, सभागृहाच्या भिंती हीच जर मोठमोठी चित्रे बनून गेली तर? सध्या ही कला स्ट्रीट आर्ट म्हणजेच रस्त्यावरील कला या नावानं ओळखली जाते.


स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल

रस्त्यावरील कला भारताच्या सांस्कृतीक प्रतिमानाचा एक महत्त्वाचा घटक बनत चालली आहे. तरूणांमध्ये सध्या स्ट्रीट आर्टची क्रेझ चालू आहे. या कलेला कुठल्या भाषेची गरज नाही. कुठलाही आणि कशा प्रकारचा मेसेज तुम्ही स्ट्रीट आर्टच्या माध्यमातून देऊ शकता. काही कलाकारांनी या कलेत प्राविण्य मिळवलं आहे. अशाच काही महिला कलाकारांनी एकत्र येत मुंबईतल्या मरोळमध्ये Ladies First Street Art Festival भरवलं.


ग्रॅफीटी एजन्सी विकेड ब्रोझ आणि मिल्ट्रीरोड रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन यांची ही संकल्पना आहे. या दोघांनी एकत्र येत भारतातील पहिलं महिला स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल आयोजित केलं होतं. अंधेरीतल्या मरोळ आर्ट गावात मार्च २५ ते ३१ मार्च या कालावधीत या फेस्टिव्हलचं आयोजन केलं होतं.  


मन मोहून टाकणाऱ्या पेंटिंग्स

सुमारे ३० महिला कलाकार आणि चित्रकारांनी एकत्र येत १० हजार चौरस भिंतीवर आणि इमारतींवर आपली जादू विखूरली आहे. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातून या ३० महिला कलाकार आल्या आहेत. त्यापैकी न्यूझीलंड आणि बोस्टनमधून दोन तरूणी आल्या आहेत. या कलाकारांनी साकारलेल्या वेगवेगळ्या डिझाईन खरचं मन मोहून टाकतील अशाच आहेत. या पेंटिंग काढण्यासाठी परिसरातील रहिवाशांची परवानगी काढण्यात आली होती. त्यानंतर प्रत्येक बिल्डींगवर आर्ट साकारण्याची जबाबदारी एका-एका मुलीला देण्यात आली. फेस्टिव्हलमध्ये कार्यशाळा, कला प्रदर्शन, हिप-हॉप सायफर आणि स्ट्रीट आर्ट यांसारख्या विषयावर कार्यशाळा देखील घेण्यात आल्या.


फेस्टिव्हलचा उद्देश

स्ट्रीट आर्ट फक्त पुरुषांची मक्तेदारी नसून महिला देखील यात अव्वल असल्याचं या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवाय महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि आपल्यातील प्रतिभा दर्शवण्यासाठी एक संधी मिळावी हा या फेस्टिव्हलचा हेतू आहे. या भिंतींचा आर्ट कॅनव्हासप्रमाणे वापर केला तर नक्कीच हे आर्ट वर्क लोकांचा ताण कमी करण्यास मदत करेल


आर्ट फेस्टिव्हल संपलं असलं तरी तुम्ही मरोळ आर्ट व्हिलेजमध्ये जाऊन तिथल्या चित्रांचा आनंद घेऊ शकता

कुठे - भारत वन, मिल्ट्रीरोड, मरोळ आर्ट व्हिलेज, अंधेरी (पू.)


हेही वाचा

मानसिक आरोग्यावर भाष्य करणारी 'बोलकी भिंत'


संबंधित विषय
Advertisement