माहात्म्य लक्ष्मीपूजनाचं

    मुंबई  -  

    मुंबई - दिवाळीचा प्रत्येक दिवस शुभच मानला जातो कारण हा सण अंधार दूर करून सर्वत्र प्रकाश पसरवतो. त्यातही लक्ष्मीपूजनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी घरात लक्ष्मीची छोटी मूर्ती स्थापन करून भक्तीभावे पूजा केली जाते. पाच वस्तूंनी लक्ष्मीचं पूजन केलं जातं. घरात सुख ,समृद्धी आणि भरभराट यावी हाच या पूजेमागचा उद्देश असतो. लक्ष्मीपूजनासाठी चमेली, गुलाब या फुलांपासून बनवलेलं अत्तर वापरलं जातं. या वेळी कागदावर लक्ष्मी यंत्र बनवलं आखून त्याचीही पूजा केली जाते. एका विड्याच्या पानावर केशर आणि हळद याच्या मिश्रणापासून श्री लिहून ते पान डाव्या गालात ठेवणं शुभ मानलं जातं. त्यानंतर लक्ष्मीचं नामस्मरण केलं जातं.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.