Advertisement

तुम्हाला लिहायला आवडतं? मग रायटर्स लाऊंजमध्ये या!


तुम्हाला लिहायला आवडतं? मग रायटर्स लाऊंजमध्ये या!
SHARES

लेखकांच्या अनेक भन्नाट विलक्षण सवयी असतात. कुणी उभं राहून लिहितं, कुणी बेडवर आडवं पडून लिहितं, कुणी लॅपटॉपवर लिहितं, तर कुणाचं चहा, कॉफी प्यायल्याशिवाय डोकं चालतं नाही. पण यासोबतच आणखी काही गोष्टी आहेत, ज्यामुळे लेखकाला आपले विचार कागदावर उतरवता येत नाहीत आणि ते म्हणजे शांत वातावरण आणि योग्य स्थळ. पण हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात आणि गोंधळात शांत वातावरण तर सोडाच, एक योग्य स्थळ सापडणं कठीणचं! मुंबईसारख्या शहरात तर नाहीच नाही. पण आता लेखकांना त्यांचं हक्काचं एक ठिकाण मिळालं आहे. जिथे लेखक शांततेत विचार करू शकतात. त्यांना रोखणारं, टोकणारं किंवा अडवणारं कोणी नसेल. फक्त ते आणि त्यांचे विचार


लेखकांसाठी 'रायटर्स लाऊंज'

फर्स्ट स्टेप एन्टरटेन्मेंट कॅपिटलच्या क्रिएटिव्ह हेड स्वाती सेमवाल यांनी लेखकांसाठी वर्सोव्यात 'रायटर्स लाऊंज' सुरू केला आहे. सर्व वयोगटातील लेखक रायटर्स लाऊंजमध्ये येऊ शकतात. लिखाणासाठी योग्य जागा न मिळणे याचा सामना अनेक लेखकांना करावा लागतो. अशाच लेखकांसाठी ही योग्य जागा आहे. इथं तुम्ही बसू शकता आणि शांततेत लिखाण करू शकता.

स्वाती सेमवाल म्हणतात की, "मला याचा अनुभव आहे. इतर लेखकांप्रमाणे मी सुद्धा योग्य जागेच्या शोधात असायचे. पण मला शांततेत लिखाण करायला मिळेल अशी जागा सापडायचीच नाही. त्यामुळे मी ठरवलं की अशी जागा स्वत: इतर लेखकांना उपलब्ध करून द्यावी. या संकल्पनेतूनच रायटर्स लाऊंजची स्थापना झाली.”

प्रसिद्ध लेखिका जुही चतुर्वेदी म्हणाल्या की, "स्क्रीन रायटर्स असोसिएशनचे सदस्य असलेल्या सर्व लेखकांना योग्य जागा आणि शांत वातावरण मिळेल, याची मला खात्री आहे. रायटर्स लाऊंजमुळे सर्व लेखकांना एकाच छताखाली काम करण्याची संधी मिळत आहे."

सर्व लेखकांना लिखाणासाठी प्रोत्साहीत करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. रायटर्स लाऊंजच्या माध्यमातून चांगल्या कथा निर्माण होतील. चांगल्या लेखकांनी लिहिलेल्या कथेवरून लेखकांना चित्रपट निर्मिती करण्याची संधीदेखील मिळू शकते.

इम्रान अश्रफ, संस्थापक, फर्स्ट स्टेप एन्टरटेन्मेंट कॅपिटल

या माध्यमातून लेखकांच्या कथांना एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. चांगल्या कथांवर आधारीत शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी, फीचर फिल्म बनवण्यात येणार आहे. या फिल्म यु-ट्यूबवर चित्रीत केल्या जातील. लेखकांना रायटर्स लाऊंजमध्ये वाय-फाय, कॉफी यांसरख्या गोष्टी देखील उपलब्ध करून दिल्या जातील.

सो, जर तुम्ही हार्डकोअर लेखक असाल, तर तुमच्यासाठी ही जागा अगदी योग्य आहे. कादंबरी, पुस्तक किंवा एखादी कथा तुम्ही इथं बसून शांततेत लिहू शकता.



हेही वाचा

पाप्पारोती कॅफे, मलेशियन बन्स आणि बरंच काही!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा