मिनी क्लबमॅन भारतात दाखल

 Santacruz
मिनी क्लबमॅन भारतात दाखल
मिनी क्लबमॅन भारतात दाखल
मिनी क्लबमॅन भारतात दाखल
See all
Santacruz, Mumbai  -  

सांताक्रूझ - बीएमडब्ल्यू मिनी क्लबमॅन ही हॅचबॅक श्रेणीतली गाडी भारतातही लाँच झाली आहे. आकारानं लहान असली, तरीही ही गाडी सेदान श्रेणीतल्या गाड्यांनाही टक्कर देऊ शकेल अशी तिची रचना आहे.

सांताक्रूझच्या ग्रँड हयातमध्ये गुरुवारी या गाडीचं लाँचिंग झालं. 37 लाख 90 हजारांच्या या गाडीत 2 लीटरचं पेट्रोल इंजिन आहे. 192 बीएचपी इतकी शक्ती प्रदान करणारं हे इंजिन आणि 8 स्पीट ऑटोमेटिक गियरला जोडलंय. त्यामुळे फक्त 7.2 सेकंदांत ही गाडी 100 किमीचा वेग गाठू शकते. मात्र वेगवान ड्राइव्हचा आनंद देतानाच चांगलं मायलेजही मिळेल अशा प्रकारची यंत्रणाही गाडीत आहे. आकारानं छोटी वाटली तरी गाडीतली जागा चांगली आहे आणि 360 लिटरची डिकीही या गाडीत उपलब्ध आहे.

Loading Comments