Advertisement

केरळच्या हाऊसबोटची मजा अनुभवा आता मुंबईत!

हाऊसबोट सेवा मुंबईत पुढच्या महिन्यात म्हणजे १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या तरी मुंबईत ३ ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे. बेलापूर, गेट वे ऑफ इंडिया आणि मालाडच्या मार्वे समुद्रकिनारी पर्यटकांना आता आलिशान अशा हाऊसबोटचा आनंद घेता येणार आहे.

केरळच्या हाऊसबोटची मजा अनुभवा आता मुंबईत!
SHARES

हाऊसबोट आज केरळच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक बनलं आहे. केरळच्या बॅकवॉटरमध्ये हाऊसबोटमधून क्रूजिंग करणं हा पर्यटकांसाठी एक अद्भूत अनुभव असतो. आता मुंबईकरांना देखील केरळच्या या हाऊसबोटचा आनंद घेता येणार आहे. पण यासाठी तुम्हाला केरळला जाण्याची गरज नाही. तर केरळमध्ये प्रसिद्ध असणारी ही हाऊसबोट सेवा लवकरच मुंबईत सुरू होणार आहे!


कुठे सुरू होणार हाऊसबोट?

हाऊसबोट सेवा मुंबईत पुढच्या महिन्यात म्हणजे १५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या तरी मुंबईत ३ ठिकाणी ही सेवा सुरू होणार आहे. बेलापूरगेट वे ऑफ इंडिया आणि मालाडच्या मार्वे समुद्रकिनारी पर्यटकांना आता आलिशान अशा हाऊसबोटचा आनंद घेता येणार आहे. बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया दरम्यान हाऊसबोट सेवा सुरू होणार आहे. बेलापूरहून हाऊसबोट दुपारी १२ वाजता रवाना होणार. नवी मुंबई समुद्र किनारी फेरफटका मारून ही बोट एलिफन्टा करत पुढे गेट वे ऑफ इंडियाला पोहोचणार. गेट वे ऑफ इंडियाला ही बोट एक रात्र थांबणार. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता हाऊसबोट पुन्हा बेलापूरसाठी रवाना होणार.


पर्यटनाला चालना देण्यासाठी हा उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. केरळप्रमाणे महाराष्ट्राला देखील मोठी किनारपट्टी लाभली आहे. यासाठी १३ कंपन्यांना आम्ही परवानगी दिली असून सर्व देखभाल याच कंपन्या करणार आहेत. तसंच एकूण १३ ठिकाणी ही सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे केरळाचा अनुभव महाराष्ट्रातल्या पर्यटकांना लवकरच अनुभवता येणार आहे.

अतुल पटणीमुख्य कार्यकारी अधिकारी, एमएमडी 


कशी असेल हाऊसबोट?

फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा ही हाऊसबोट काही कमी नाही. केट्टुवल्लम नावानं देखील या हाऊसबोट ओळखल्या जातात. केट्टुवल्लम काथ्याच्या दोऱ्यांनी एकत्र बांधलेली असते. जॅकवूडच्या फळ्यांनी आणि काथ्यानं ही बोट बनलेली असते. या बोटीतच रेस्टरूम आणि किचनची सोय असते. त्यामुळे बोटीवर खाण्या-पिण्याची सोय असतेच. यात सहा बेड रूम असतील. या हाऊसबोटची सफर करण्यासाठी ५००० ते ७००० रुपये मोजावे लागतील.



हेही वाचा

मुंबईतील हा समुद्रकिनारा तुम्ही पाहिलाय का?

मुंबई ते गोवा... रेडी टू पेडल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा