Advertisement

मुंबईतील हा समुद्रकिनारा तुम्ही पाहिलाय का?


मुंबईतील हा समुद्रकिनारा तुम्ही पाहिलाय का?
SHARES

समुद्र किनारी फिरणे, लाटा पाहत एखादी संध्याकाळ समुद्रकिनारी घालवणं किंवा समुद्रकिनारी सुर्यास्तचा आनंद घ्यायला कुणाला नाही आवडणार. पण मुंबईतले समुद्र किनारे म्हटलं की, कचरा आणि उकिरडा हेच दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं. पण आम्ही तुम्हाला मुंबईतल्या अशा समुद्र किनाऱ्याची सफर घडवणार आहोत जो फक्त स्वच्छच नाही तर सुंदर देखील आहे. मुंबईत एखादा सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे, यावर तुमचा विश्वासच बसत नसेल. पण हे खरं आहे. जुहू इथल्या 'सिलव्हर' समुद्र किनाऱ्याची बातच काही और आहे.



'या' समुद्र किनाऱ्याचे वैशिष्ट्य

समुद्रकिनारा म्हटला की माणसांची सततची वर्दळ असतेच. पण हा समुद्रकिनारा मात्र याला अपवाद ठरला आहे. स्वच्छ आणि सुंदर अशा या समुद्रकिनारी तुम्हाला जास्त वर्दळ दिसणार नाही.

विशेष म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर मंदिर, थिएटर आणि एक पार्क देखील आहे. सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत हे पार्क खुले असते. कित्येक जण सकाळी आणि संध्याकाळी टेहळणी किंवा मेडिटेशन करण्यासाठी पार्कमध्ये जातता. शिवाय या पार्कमध्ये बसून सुर्याचा अस्त होताना पाहणे हा देखील एक सुखद अनुभव आहे.



मस्त गाणी ऐकत तुम्ही समुद्रकिनारी टेहळणी देखील करू शकता. अतिशय शांतताप्रिय असा हा समुद्रकिनारा असून तुम्ही काही वेळ का होईना तिथे रिलॅक्स होऊ शकता. त्यामुळे रिलॅक्स होण्यासाठी तुम्ही बिनधास्त या समुद्रकिनाऱ्याला भेट द्या, सोनेरी क्षणांचा आनंद तुम्ही 'सिलव्हर' बीचवर घेऊ शकता.  



कुठे आहे हा समुद्रकिनारा

जुहू इथं हा समुद्ककिनारा आहे. जुहूच्या नोवोटेल हॉटेल इथून तुम्ही रिक्षा करून या समुद्रकिनारी येऊ शकता. इस्कॉन मंदिराजवळून समुद्रकिनारी येण्यासाठी प्रवेशद्वारे केले आहे.  




हेही वाचा

'असे' मेसेज असतील, तर समजून जा ती किंवा तो तुमच्यात इंटरेस्टेड आहे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा