Advertisement

'असे' मेसेज असतील, तर समजून जा ती किंवा तो तुमच्यात इंटरेस्टेड आहे!


'असे' मेसेज असतील, तर समजून जा ती किंवा तो तुमच्यात इंटरेस्टेड आहे!
SHARES

प्रेम ही एक सुंदर भावना आहे. पण हे प्रेम सुरुवातीला समजायला फारच कठीण असतं. कारण प्रेमाच्या विश्वात हे पहिलंच पाऊल असतं. पण पूर्णवेळ काही एकत्र रहाता येत नाही. मग संवाद साधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे मोबाईल. अशा परिस्थितीत तुमचा मोबाईल फोन सारखाच वाजत असतो. तिच्या किंवा त्याच्या मेसेजची किंवा कॉलची आपण वाट पाहत असतो. मेसेजमधून त्याच्याशी किंवा तिच्याशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करतो. कधी कधी असं होतं की ती किंवा तो आपल्याला आवडत असतो. पण समोरचा देखील आपल्या प्रेमात आहे की नाही हे काही कळत नाही. अशा वेळी मोबाईलवर संवाद साधताना तुम्ही अंदाज लावू शकता. छोट्या छोट्या गोष्टींवरून ती किंवा तो काय विचार करतो हे कळू शकतं. जसं की, मोबाईलवर तिनं किंवा त्यानं मेसेज केला, तर त्याच्या उत्तरावरून कळू शकतं की त्याच्या मनात काय चाललंय!असे मेसेज ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की ती किंवा तो तुमच्यात इंटरेस्टेड आहे की नाही. तुम्ही केलेल्या मेसेजचा जर ती अशा प्रकारे रिप्लाय देते, तर ती नक्कीच तुमच्यात इंटरेस्टेड आहे!


काय असतील हे मेसेजेस

१) 'सॉरी, मी लवकर झोपलो. त्यामुळे तुझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही', असा रिप्लाय दिला तर समजा ती किंवा तो तुमच्यात रूची घेतोय. कारण तो रिप्लाय देऊ शकला नाही याची खंत व्यक्त करत आहे. तुम्ही केलेल्या मेसेजकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही, असं तिला किंवा त्याला दाखवायचं असतं. त्यामुळे फ्री होताच तो तुमच्या मेसेजला रिप्लाय देण्याला प्राधान्य देतो. याचा अर्थ त्याला नक्कीच तुमच्या मेसेजमध्ये आणि तुमच्याशी बोलण्यात रूची आहे.

२) एकत्र नसताना तिला किंवा त्याला तुमच्या आयुष्यात अधिक रूची असते. तुमच्या अवती-भवती काय होतं? किंवा आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तिला किंवा त्याला रूची असते. त्यामुळे मेसेज करून तो किंवा ती तुमचा दिवस कसा होता? आज विशेष काय? अशी विचारपूस करत असतात.

३) तुमच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजला तो किंवा ती कशाप्रकारे रिप्लाय देतात हे देखील महत्त्वाचं आहे. तुम्ही गुड मॉर्निंगचा मेसेज केलात आणि तिनं किंवा त्यानं रिप्लाय दिला की, 'गुड मॉर्निंग टू, मला आशा आहे की कामाव्यतिरिक्तही तुला माझ्याशी बोलायला आवडेल' अशा आशयाचे रिप्लाय दिले तर समजून जा की त्याला किंवा तिला तुमच्याशी बोलण्यात रूची आहे. जर तुमच्या 'गुड मॉर्निंग'ला फक्त 'गुड मॉर्निंग टू' असा रिप्लाय आला, तर त्याला तुमच्याशी पुढे बोलण्यात रूची नाही, असे समजून जा की तो किंवा ती फक्त कामाव्यतिरिक्त तुमच्याशी बोलू इच्छित नाही.४) तुम्ही मेसेज केला आणि ती किंवा तो खूप व्यस्त आहे, त्यामुळे तुमच्या मेसेजला लगेच उत्तर देणं त्याला किंवा तिला जमलं नसेल. वेळ नाही मिळाला तर ती किंवा तो तुम्हाला मेसेज करून सांगेल की, 'मी जरा कामात आहे. वेळ मिळाल्यावर किंवा कामातून फ्री होऊन कॉल करतो'. कामातून वेळ काढून फक्त तुम्हाला कॉल करण्याला, मेसेज करण्याला ती किंवा तो प्राधान्य देतो. तुम्ही कोणत्या नात्यात नाही आहात, पण तरीही तो किंवा ती केवळ तुमच्यासाठी वेळ काढते.

५) तुमच्यात रूची घेत असेल, तर ती किंवा तो तुम्हाला रोमँटिक मेसेज करू शकतात. जसं की 'आपण बाहेर भेटूया का? जेवायला जायचं का? जेवल्यानंतर मूव्हीला आणि लाँग ड्राइव्हला जाऊया का?' अशा आशयाचे मेसेज आले म्हणजे तो तुमच्यात रूची दाखवतोय.

६) कितीही झोप येत असली, तरी तो किंवा ती मेसेजद्वारे संवाद साधण्यास उत्सुक असेल. झोप येत नसेल तर तो किंवा ती कॉलही करू शकतात आणि सकाळपर्यंत देखील बोलू शकतात. जर तुम्ही मेसेज केला आणि त्याला तुमच्याशी बोलण्यात रूची नसेल, तर तो किंवा ती तुमच्या मेसेजचा रिप्लायच देणार नाही.


यासोबतच इतर गोष्टींकडे देखील दुर्लक्ष करता येणार नाही. तो किंवा ती तुमच्याशी प्रत्यक्षात किती, कसा बोलतो? त्याचा स्वभाव कसा आहे? या गोष्टी देखील तुम्ही नोटीस केल्या पाहिजेत. या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं, तर तुमचा गोंधळ होणार नाही.  हेही वाचा

सावधान! तुमच्याही मोबाईलचा होऊ शकतो स्फोट!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा