Advertisement

मुंबई ते गोवा... रेडी टू पेडल


मुंबई ते गोवा... रेडी टू पेडल
SHARES

आठ दिवस... मुंबई ते गोवा... ५८൦ किलोमीटर आणि सोबतीला फक्त एक सायकल... भन्नाट आयडिया आहे की नाही... सायकलस्वारी करणाऱ्यांसाठी तर ही एक पर्वणीच आहे. मुंबई ते गोवा हा प्रवास आपण फ्लाइटनं किंवा ट्रेननं करतो. पण पहिल्यांदाच मुंबई ते गोवा हा प्रवास तुम्हाला सायकलनं करण्याची संधी मिळणार आहे. 


सौजन्य


मुंबई ते गोवा कसा आहे प्लॅन?

युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे मुंबई ते गोवा सायकलस्वारीचं आयोजन केलं आहे. २ डिसेंबरला मुंबईहून सुरू होणारा हा प्रवास ९ डिसेंबरला गोव्यात संपणार आहे. तुमचं सामान कॅरी करू शकणारी सायकल असणं फार आवश्यक आहे. 'ट्रेक ३७൦൦ एमटीबी' ही सायकल ट्रेकिंगसाठी योग्य आहे. कारण तुम्ही घाटातून प्रवास करणार. त्यामुळे सायकल देखील त्यायोग्य असणं गरजेचं आहे.  २ डिसेंबरला तुम्हाला मुंबईतल्या युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या बेस कॅम्पला रिपोर्ट करणं आवश्यक आहे. २ डिसेंबरला या ट्रीपमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलस्वारांनी युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाच्या ऑफिसमध्ये एकत्र जमायचं आहे. तिथून तुमचा प्रवास सुरू होणार. युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाचं ऑफिस परेल इथल्या टाटा हॉस्पीटलजववळील रिजन्ट चेंबरमध्ये आहे.


अशी कराल नोंदणी

तुम्हाला मुंबई ते गोवा सायकलस्वारीचा आनंद लुटायचा असेल तर नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी http://www.yhaindia.org/individual-membership-application.php या लिंकवर क्लिक करा. तसंच तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर http://www.yhaindia.org/adventure-programme.php?id=374&ty=s या वेबसाईटला भेट देऊ शकता. 


किती खर्च?

या ट्रीपसाठी तुम्हाला १३ हजार ६५० रूपये खर्च करावे लागणार आहेत. यामध्ये तुमची राहण्याची, खाण्याची सोय करण्यात आली आहे.


जर तुम्हाला काही तरी वेगळं करायचं असेल तर तुम्ही मुंबई ते गोवा हा प्रवास सायकलनं करा. हा प्रवास तुम्हाला वेगळा अनुभव देईल याची आम्हाला खात्री आहे.  हेही वाचा

मुंबईतील हा समुद्रकिनारा तुम्ही पाहिलाय का?

'असे' मेसेज असतील, तर समजून जा ती किंवा तो तुमच्यात इंटरेस्टेड आहे!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा