मनसोक्त खा, मित्र बनवा

कफ परेड - लसुनी खिमा, पातरा फिश, लाल झणझणीत मसाल्यात मटणाचे तुकडे, पाया सूप अशी नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं ना? ही झणझणीत मेजवानी तुम्हाला कुठल्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये चाखायला मिळणार नाही. ही मेजवानी मिळते ती फक्त आणि फक्त नफीसा कपाडिया यांच्या किचनमध्ये. कपाडिया यांनी पारंपरिक बोहरी जेवण बनवण्यात विशेषता प्राप्त केलीय. दर रविवारी ही मेजवानी तुम्हाला चाखता येईल. प्रत्येक व्यक्तीमागे 1500 रुपये अशी ही मेजवानी आहे. या खास झणझणीत मेजवानीचा आस्वाद घेण्यासाठी फक्त मुंबईतीलच नव्हे तर, परदेशातूनही खवय्ये भेट देतात. मेजवानी सोबत मित्र बनवण्याचा आनंदही या वेळी खवय्यांना घेता येतो. फक्त एवढंच नाही तर वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानीचा आनंंद घेता येईल. मुंबईत बोहरी,पारसी, पूर्व भारतीय अशा अनेक संस्कृती जपणारी माणसं राहतात. त्यांच्या चवी, आवडीनुसार इथे जेवण उपलब्ध करुन दिले जाते.

Loading Comments