Advertisement

केमिकल इंजिनिअर भटकतोय रस्त्यावर


SHARES

बोरिवली - स्कर्तृत्वावर यश मिळवलेल्या, उच्चशिक्षित व्यक्तीला आयुष्याच्या उत्तरार्धात चक्क फुटपाथवर दिवस काढावे लागतील, असं सांगितलं तर विश्वास बसेल? पण असं घडलंय. पेशानं केमिकल इंजिनिअर असलेले अरुण पौराना यांच्यावर वयाच्या 70व्या वर्षी मुंबईच्या रस्त्यांवर कफल्लक अवस्थेत फिरायची वेळी आली आहे. ते बोरिवलीतल्या एका फुटपाथवर पाच दिवसांपासून जगण्याची लढाई लढतायत. अरुण पौराना यांनी उमेदीच्या काळात स्विमिंग आणि अभ्यासातही गोल्ड मेडल पटकावलं होतं. त्यांच्या यशाची कमानही चढती होती. पण बदलती परिस्थिती आणि कौटुंबिक वाद यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एके काळी गुजरातमध्ये त्यांची केमिकल फॅक्टरी होती. बोरिवलीतच एक फ्लॅटही होता. त्यांचा सांताक्रूझमध्येही फ्लॅट आहे. तिथे त्यांची पत्नी राहते. त्या घरात जाण्याची इच्छाच होत नसल्याचं अरुण यांनी सांगितलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा