Advertisement

मुंबईत पहिल्यांदाच 'ट्रायथल'चं आयोजन, सहभाग घेण्यासाठी हे वाचा!

ट्रायथल म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा आहे. त्यात मुख्यत: रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग या स्पर्धांचा समावेश असतो. या स्पर्धेत हे तिन्ही क्रीडा प्रकार सलग पार पाडायचे असतात.

मुंबईत पहिल्यांदाच 'ट्रायथल'चं आयोजन, सहभाग घेण्यासाठी हे वाचा!
SHARES

मुंबईत पहिल्यांदाच ट्रायथल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्रायथल स्पर्धेबद्दल क्वचितच कुणाला माहीत असावं. ट्रायथल ही मॅरेथॉनसारखीच असते. पण ती वाटते तितकी सोपी नाही. मॅरेथॉनमध्ये फक्त रनिंग असतं. पण ट्रायथलमध्ये ठराविक वेळेत तुम्हाला वेगवेगळे प्रकार पूर्ण करायचे असतात.


ट्रायथल म्हणजे काय?

ट्रायथल म्हणजे वेगवेगळ्या अॅथलेटीक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेली स्पर्धा आहे. त्यात मुख्यत: रनिंग, स्विमिंग आणि सायकलिंग या स्पर्धांचा समावेश असतो. या स्पर्धेत हे तिन्ही क्रीडा प्रकार सलग पार पाडायचे असतात. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी अंतर ठरलेले असते. पण विले पार्लेत आयोजित ट्रायथल स्पर्धेत थोडा बदल आहे. यात रनिंग, स्विमिंग हे क्रीडा प्रकार तर ठरलेले आहेतच. पण सायकलिंग एवजी रायफल शूटिंग हा क्रीडा प्रकार ठेवण्यात आला आहे. या स्पर्धेत ४०० मीटर स्विमिंग, २.२ किलोमीटर रनिंग, त्यानंतर रायफल शूटिंग आणि मग पुन्हा २.२ किलोमीटर रनिंग अशा अॅथलेटिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

स्विमिंग - ४०० मीटर

रनिंग  - २.२ किलोमीटर

रायफल शूटिंग - ५ शॉट्स

रनिंग - २.२ किलोमीटर

स्पर्धकांना हे चार टप्पे ८൦ मिनिटांमध्ये म्हणजेच १ तास २൦ मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत.

स्विमिंग - २८ मिनिटं

रनिंग - २൦ मिनिटं

रायफल शूटिंग - १२ मिनिटं

रनिंग - २൦ मिनिटं 

तुमच्यापैकी काही रनिंग आणि स्विमिंगमध्ये अव्वल असतील. पण रायफल शूटिंग हा क्रीडा प्रकार थोडा अवघड आहे. त्यासाठी स्पर्धेच्या एक आठवडा आधी म्हणजेच ४ मार्च रोजी दुपारी ३ ते ६ दरम्यान ट्रेनिंग सेशन घेण्यात आलं. १൦ मार्चला विले पार्लेमध्ये ही स्पर्धा होणार आहे.


कुठे कराल नोंदणी?

जर तुम्हाला ट्रायथल स्पर्धेत सहभागी व्हायचं असेल, तर नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणीसाठी तुम्हाला १८०० रुपये भरावे लागणार आहेत. १२ ते १८ वयोगटातील स्पर्धकांसाठी १६०० आणि १८ च्या पुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी १८०० रुपये मोजावे लागणार आहेत. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी http://www.bazabuzz.com/events/2/mumbai-triathle-2018.html किंवा http://youtoocanrun.com/races/mumbai-triathle/ या लिंकवर क्लिक करा. याशिवाय अधिक माहितीसाठी मिहीर (9892298463 / 9768010211) किंवा राजेंद्र (7715819973) यांच्याशी संपर्क साधू शकता.



हेही वाचा

जग जिंकणारा दादरचा आयर्नमॅन!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा