Advertisement

Coronvirus: संसर्ग टाळण्यासाठी फॅशनेबल मास्क

सर्जिकल मास्क न लावता नागरिक विविध प्रकार व डिझाइनचे मास्क घालत आहेत.

Coronvirus: संसर्ग टाळण्यासाठी फॅशनेबल मास्क
SHARES

कोरोना व्हायरसमुळं मुंबईसह देशातील नागरिक घबरदारी घेत आहेत. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आहे. त्यामुळं सर्दी, खोकला झाल्यास नाक व तोंडावर रुमाल किंवा टिश्यू धरा, खोकताना देखील हातावर रुमाल धरा असं आवाहन करण्यात आलं होतं. तसंच, अनेकांनी रुमालाऐवजी मास्कचा वापर करणं पसंत केलं. त्यानुसार, मुंबईतील प्रत्येक जण चेह-याला मास्क लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहे. परतु, आता या मास्कमध्ये विविध प्रकार आल्यानं अनेक जण स्टाइल म्हणून आपल्या आवडीचं मास्क चेहऱ्यावर लावून घराबाहेर पडत आहेत.

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणार वाढ पाहत, तसंच, तोंडावाटे अथवा श्वसनातून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असल्यानं, खबरदारीचा उपाय म्हणून चेहऱ्यावर मास्क लावत आहेत. मात्र, केवळ सर्जिकल मास्क न लावता नागरिक विविध प्रकार व डिझाइनचे मास्क घालत आहेत.

कोरोनामुळं नागरिकांना मास्क घालणं पसंत केल्यानं बाजारातही विविध प्रकारचे मास्क विक्रीसाठी आले आहेत. एन ९५ मास्क, सर्जिकल मास्क, अँटी पोल्युशन मास्क, बाइक रायडिंग मास्क व साधा मास्क असे विविध प्रकारचे व विविध रंगांचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलंही भुताची खोपडी, दातं यासरख्या डिझाइनचे मास्क घालत आहेत. मात्र या मास्कच्या माध्यमातून संरक्षण होणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

कोरोना हा संसर्ग असला तरी नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच मास्क घालावा असं अावाहन राज्य सरकारनं केलं होतं. मात्र, कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळल्याची माहिती मिळताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर त्यांनी मेडिकल, तसंच इतर दुकानांवर मास्क, हँडवॉश, तसेच सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी गर्दी केली. मास्क व सॅनिटायझरची अचानक मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यानं बाजारात मास्कचा प्रचंड तुटवडा भासू लागला.

अनेकांनी ही संधी साधत कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन असणारे व रंगीबेरंगी मास्क तयार करून ते बाजारात विक्रीस आणले. यामध्ये अगदी २० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतचा मास्कही बाजारात उपलब्ध आहे. मेडिकलमध्ये उपलब्ध असणाऱ्या एन ९५ व सार्जिकल मास्कचा वापर रुग्णालयात डॉक्टरांकडून केला जातो.



हेही वाचा -

Coronavirus Update: आपण फेज २ मध्ये, पुढचे १० दिवस खूप महत्त्वाचे - आरोग्यमंत्री राजेश टोपे

Coronavirus Updates: अनावश्यक गर्दी टाळा, ट्रेन, बस बंद करण्याची वेळ आणू नका- मुख्यमंत्री



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा