Advertisement

हातातली चिल्लर कधी लक्षपूर्वक पाहिलीये का? मग हे वाचा!

चलनात जेवढी महत्त्वाची भूमिका नोटांची आहे, तेवढीच महत्त्वाची भूमिका नाण्यांची देखील आहे. त्यामुळे नाणी देखील नोटांएवढीच गरजेची आहेत. पण रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या या नाण्यांना तुम्ही कधी काळजीपूर्वक पाहिलं आहे का? नाही? मग एकदा बघाच, तुम्ही वापरत असलेली नाणी काय बोलतात ते!

हातातली चिल्लर कधी लक्षपूर्वक पाहिलीये का? मग हे वाचा!
SHARES

भारतीय नाण्यांचा जन्म इ..पूर्व ६ व्या शतकात मानला गेला आहे. २६०० वर्षांची अखंडित परंपरा भारतीय नाण्यांना लाभली आहे. चलनात जेवढी महत्त्वाची भूमिका नोटांची आहे, तेवढीच महत्त्वाची भूमिका नाण्यांची देखील आहे. त्यामुळे नाणी देखील नोटांएवढीच गरजेची आहेत. पण रोजच्या व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या या नाण्यांना तुम्ही कधी काळजीपूर्वक पाहिलं आहे का? नाही? मग एकदा बघाच, तुम्ही वापरत असलेली नाणी काय बोलतात ते!  



) रिझर्व्ह बँक ही भारताची सर्वात मोठी मुद्रण संस्था आहे. आरबीआय नवीन नोटांची छपाई करते. त्या नोटांना इतर बँकांच्या माध्यमातून वितरित करते. भारतामध्ये १ रुपयाची नोट सोडता इतर सर्व नोटांची छपाई आरबीआय करते. पण १ रुपयाची नोट आणि इतर सर्व नाण्यांना तयार करण्याची जबाबदारी वित्त मंत्रालयाकडे आहे. वित्त मंत्रालय आरबीआयच्या माध्यामातून एक रुपयाची नोट आणि नाण्यांचं वाटप करतं.



) मुंबई, कोलकात्ता, हैदराबाद आणि नोएडा या चार ठिकाणी भारतीय नाणी तयार केली जातात. मुंबई आणि कोलकाता इथल्या कारखान्याची स्थापना हैदराबादच्या निजामानं १९०३ साली केली होती. ज्याला १९५० मध्ये भारत सरकारनं आपल्या अधिपत्याखाली घेतलं. त्यानंतर १९५३ पासून या कारखान्यात भारत सरकारनं नाणी बनवण्यास सुरुवात केली. भारत सरकारनं १९८६ साली उत्तर प्रदेशच्या नोएडा सेक्टरमध्ये शेवटच्या मिंटची स्थापना केली होती.



) प्रत्येक नाण्यावर एक चिन्ह छापलेलं असतं. ज्यावरून ते कोणत्या कारखान्यात तयार केलं आहे, हे तुम्हाला समजू शकतं. मुंबईमध्ये बनवण्यात येणाऱ्या नाण्यावर छापलेल्या तारखेच्या खाली डायमंडचं एक चिन्ह असतं. हैदराबादच्या कारखान्यात छापलेल्या नाण्यांवर एक स्टार असेल तर ते चिन्ह हैदराबाद कारखान्याचं आहे. नोएडामध्ये बनवण्यात आलेल्या नाण्यावर एक डॉट असतो आणि कोलकातामध्ये बनवण्यात येणाऱ्या नाण्यांवर कुठलंच चिन्ह नसतं.



) भारत सरकार नाणी बनवण्यासाठी फेरिटिक स्टेनलेस स्टीलचा वापर करतं. यामध्ये १७ टक्के क्रोमियम आणि ८३ टक्के लोखंड असतं. सुरुवातीला नाणी कॉपरनं बनवली जायची. पण कॉपरच्या किंमतीमध्ये वाढ झाली आणि नाणी बनवण्याचा खर्च वाढला. त्यामुळे आता स्टेनलेस स्टीलचा वापर केला जातो.



) सुरुवातीला नाण्यांना वितळवून त्या धातूचा वापर करण्यात यायचा. अशा अनेक घटना समोर आल्या. त्यामुळे सरकार त्यांचा आकार कमी करत आहे. याशिवाय नाण्यांचा आकार कमी केल्यानं त्यांची निर्मिती करण्यासाठी येणारा खर्चही कमी होतो.


7) एकेकाळी ५ रुपयांचे कॉईन बांग्लादेशमध्ये स्मगल केले जायचे. हे कॉईन वितळवून त्यापासून दाढीचे रेजर बनवण्यात यायचे.



८) १० रुपयाचा एक कॉईन बनवण्यासाठी ६ रुपये १० पैसे खर्च येतो.




हेही वाचा

नोटाबंदीनंतर आता नाणेबंदी?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा