मार्केटमध्ये पुन्हा डेनिमची क्रेझ !

  Andheri west
  मार्केटमध्ये पुन्हा डेनिमची क्रेझ !
  मुंबई  -  

  असं म्हणतात की दर काही दिवसांनी कपड्यांची फॅशन बदलते. आणि ती  फॅशन जर मुलींच्या कपड्यांची असेल तर मग त्यात सतत काही ना काही बदल होतच असतात. पण कधीकधी नव्या फॅशनच्या शोधात अनेकदा जुनीच फॅशन नव्या रूपात रूढ होताना दिसते. ‘डेनिम’ हीसुद्धा अशीच एक फॅशन.

  काही वर्षांपूर्वी डेनिमच्या कपड्यांची मार्केटमध्ये चलती होती. 1871मध्ये लेवी स्ट्रॉस नावाच्या जर्मन व्यक्तीने या कापडाच्या ट्राऊजर्स शिवल्या होत्या. सुरुवातीच्या काळात कामगारांसाठी ‘रफ अॅण्ड टफ’ वापरासाठी या कापडाच्या ट्राऊजर्स शिवण्यात आल्या होत्या. कालांतरानं ती फॅशन रूढ झाली. जवळपास 100 वर्षांपासून डेनिमचे कपडे लोकप्रिय होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून वाढत्या स्पर्धेमुळे डेनिम काहीसं मागे पडलं होतं. पण आता पुन्हा एकदा मार्केटमध्ये डेनिम दिसू लागलंय. मुलांसाठी फक्त डेनिम जीन्स आणि शर्ट्सचाच पर्याय उपलब्ध असला तरी मुलींसाठी मात्र डेनिम मध्ये बरेचसे ऑप्शन्स उपलब्ध आहेत. डेनिम शर्ट्स , टॉप्स , डेनिम कुर्ता एवढच नाही तर अगदी डेनिमचे  फ्रॉक आणि वन पीसचीही सध्या खूप चलती आहे.

   
  ओरिजनल डेनिम म्हटल की त्याची किंमत हजारांच्या घरात जाते. पण हल्ली डेनिमची फॅशन क्रेझ लक्षात घेता डुप्लीकेट डेनिमही मार्केटमध्ये दाखल झालंय. दादरचं स्ट्रीट मार्केट, विलेपार्ले मार्केट, फॅशन स्ट्रीट या सर्व मार्केटमध्ये हे डुप्लीकेट डेनिम सध्या उपलब्ध आहे. त्यामुळे ज्यांना १०००-१५०० रूपये खर्च करून  डेनिम कपडे विकत घ्यायचे नसतील त्यांना हे डुप्लीकेट डेनिम अगदी ५०० ते ७०० रूपयांतसुद्धा मिळेल. शेवटी काय, तर ओरिजिनल असो किंवा डुप्लीकेट, मार्केटमध्ये डेनिमचा पुनर्जन्म झालाय हे नक्की !

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.