Advertisement

निसर्गाच्या सानिध्यात घालवा आयुष्याचे काही क्षण


निसर्गाच्या सानिध्यात घालवा आयुष्याचे काही क्षण
SHARES

वीकएंडला कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन करताय? पण नेमकं कुठे? हाच प्रश्न तुम्हाला पडला असेल. माथेरान आणि महाबळेश्वर ही थंड हवेची ठिकाणं तर दरवेळीचीच ठरलेली. या वेळी काही तरी हटके होऊन जाऊदे! फिरायला जायचं प्लॅनिंग करताना तुमचा हाच गोंधळ सुरू असतो. डोंट वरी. आम्ही आहोत ना तुमचा गोंधळ दूर करायला. आम्ही तुम्हाला अशाच एका जागेची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही कधीच गेला नसाल.

निसर्गामध्ये रममाण होणं कुणाला नाही आवडणार? खळखळ वाहणारी नदी, हिरवागार डोंगर, घनदाट जंगलातून जाणारी रानवाट. अशा निसर्गरम्य वातावरणाचं आकर्षण सर्वांनाच असतं. अशीच एक जागा म्हणजे कर्जत. याच कर्जतमध्ये मूनस्टोन हॅमक या ग्रुपतर्फे एक कँप आयोजित करण्यात आला आहे. २५ आणि २६ नोव्हेंबरला तुम्ही या कँपमध्ये सहभागी होऊ शकता.



नक्की काय आहे प्लॅन?

मूनस्टोन हॅमक या ग्रुपतर्फे आयोजित कँपमध्ये तुम्ही तरंगत्या तंबूचा अनुभव घेऊ शकता. पहिल्यांदाच अशी हटके आणि वेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे. रोहीत दुबे आणि त्याचे कॉलेज मित्र अभिषेक दाभोलकर, प्रतिक जैन, मेघ दोषी, प्रदीप सिंग यांनी ही हटके संकल्पना सुरू केली आहे. ४൦ फूट लांब लाकडाच्या प्लॅटफॉर्मवर आठ तंबू उभारण्यात आलेले असतात. जवळपास २४ पर्यटक या आठ तंबूंमध्ये राहू शकतात. यासाठी फक्त तुम्हाला २,८९൦ रुपये मोजावे लागतील.



मजेशीर उपक्रम या कँपची खासियत

शेकोटीभोवती तुम्ही डान्स करू शकता. आऊटडोअर गेममध्ये व्हॉलिबॉल, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटनसारखे खेळही खेळता येऊ शकतात. तळ्याच्या काठी असणाऱ्या एका झाडावर एक छोटसं पुस्तकालय देखील उपलब्ध करून देण्यात आलं आहे. जर तुम्हाला पुस्तकं वाचायची इच्छा असेल, तर त्यातील पुस्तकंही तुम्ही घेऊ शकता.



कुठे संपर्क साधाल?

अधिक माहितीसाठी तुम्ही 9773570898 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. याशिवाय Moonstone Hammock या त्यांच्या फेसबुक पेजलाही तुम्ही भेट देऊ शकता.



हेही वाचा

आपली घरं बनतायत का सायलेंट झोन?

लहानपण दे गा देवा!


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा