Advertisement

तुमच्यात हिंमत आहे? मग या 'भयावह' फेस्टिव्हलला भेट द्या...


तुमच्यात हिंमत आहे? मग या 'भयावह' फेस्टिव्हलला भेट द्या...
SHARES

लहान असताना प्रत्येकानं भूताच्या गोष्टी नक्कीच ऐकल्या असतील. मला तर आठवतं मी लहान असाताना आमचा ग्रुप होता. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये रात्रीचं जेवून झालं की बिल्डिंगमध्ये आम्ही घोळका करून बसायचो. प्रत्येक जण पाळी पाळीनं भूताच्या गोष्टी सागायचं. तीन चेहऱ्याची बाई! उलटे पाय असणारी चेटकीन! तर कधी कुणाच्या गावच्या भूताच्या गोष्टी अशा गप्पा आमच्या चांगल्याच रंगायच्या. गोष्टी सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या दोघांच्या चेहऱ्यावर भिती असायची. पण तरीही आमच्या गोष्टी मात्र रंगायच्या. यातल्या किती गोष्टी खऱ्या की खोट्या याचा कधी त्यावेळी विचारच केला नाही. पण जाम मज्जा यायची. आता मोठे झालो त्यामुळे त्या भुताच्या गोष्टी काही पुन्हा रंगत नाहीत. असो. मी हे सर्व सांगण्याचं कारण की तुम्हाला जर अशा भुतांच्या गोष्टीमध्ये रुची असेल, तर तुम्ही मुंबईत होणाऱ्या या 'भयावह फेस्टिव्हल'ला नक्की भेट देऊ शकता!

    

रेडी फॉर फ्राईट नाईट!

लोकांना भुताच्या आणि रंजक अशा गोष्टी नक्कीच आवडतात. अशाच गोष्टींवर आधारित 'ग्रहण', 'रात्रीस खेळ चाले', बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक चित्रपट सर्वांनीच पाहिले असतील. महत्त्वाचं म्हणजे अशा गोष्टी लोकांच्या पसंतीस देखील उतरतात. तुम्हाला अशाच भुताच्या किंवा भयावह गोष्टी ऐकण्यात रुची असेल, तर तुम्ही 'फ्राईट नाईट' या फेस्टिव्हलला भेट देऊ शकता. 'डेथअशी या फेस्टिव्हलची थिम आहे. या थिमवरच आधारित तुमचा खाण्याचा मेन्यू असेल. खाण्यासोबतच तुम्हाला भयावह अशा गोष्टी ऐकण्याची संधी मिळणार आहे. कॅम्पफायर जवळ घोळका करून बसायचं आणि अंगावर काटा आणतील अशा गोष्टी ऐकण्याची मजा काही औरच! अशा गोष्टी ऐकायला भिती तर वाटते.

यासोबतच स्टोरी टेल तर्फे 'मेरी लेखाहे हॉरर स्टोरी बुक लाँच करण्यात येणार आहे. 'मेरी लेखा' हे पुस्तक रचना महादेवन यांनी लिहलं आहे. तर रत्ना सक्सेना यांनी त्याचं कथन केलं आहे.

तुमच्यात हिंमत असेल तर या फेस्टिव्हलला नक्की भेट द्या. २९ मेला रात्री ८ वाजता तुम्हाला 'द कुकू क्लब'ला भेट द्यायची आहे. यासाठी तुम्हाला तिकीटांची नोंदणी करावी लागेल. या फेस्टिव्हलला जाण्यासाठी २९९ रुपये मोजावे लागतील. तिकिटाची नोंदणी करायला इथं क्लिक करा.

कुठे? - द कुकू क्लब, मॅक्रोनेल्स कंम्पाऊंड, पाली हिल, वांद्रे

कधी? - २९ मे २०१८,रात्री ८ वाजता

किंमत? - २९९ रुपये



हेही वाचा

तुम्ही रोज वापरत असलेले 'हे' प्रोडक्ट्स कधी काळी 'असे' दिसायचे!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा