Advertisement

ब्रेकअप के बाद...ब्रेकअप बॉक्स!


ब्रेकअप के बाद...ब्रेकअप बॉक्स!
SHARES

व्हेलेंटाईन डे जवळ येतोय. अनेकांचे काही ना काही प्लॅन ठरलेले असतीलच. कुणी या व्हेलेंटाईन डे ला प्रपोज करणार असेल. तर कुणी आपल्या जोडीदाराला सरप्राईज गिफ्ट देणार असेल. पण त्यातही काही जण 'एकटा जीव सदाशिव' या टॅगलाईनमध्येच खुश असतात! पण या गोंधळात आपण आणखी कुणाला तरी विसरत आहोत असं नाही का वाटत तुम्हाला? आणखी कोण? एक प्रेमात असणारे आणि दुसरे सिंगल म्हणजेच आपल्यात असणारे असे दोन गट असतात. पण यात आणखी एक गट असतो तो म्हणजे नुकतेच ब्रेकअप झालेले! यांना कसं विसरून चालेल? कुठे दोन मनं जुळत असतात. तर कुठे जुळलेली मनं दुरावली जातात. अशाच ब्रेकअप झालेल्यांसाठी द स्टेबल बार अँड रेस्टॉरंटनं 'द ब्रेकअप बॉक्स' ही भन्नाट संकल्पना आणली आहे!



'द ब्रेकअप बॉक्स' संकल्पना काय आहे?

प्रेमी युगुलं आपापल्या परीनं व्हेलेंटाईन डे साजरा करतात. पण बिचारे ब्रेकअप झालेले मात्र आपल्याच दु:खात असतात. अशाच तरुण आणि तरुणींचं दु:ख कमी करण्याचा प्रयत्न 'द स्टेबल'नं केला आहे.

प्रेमात असतो तेव्हा सर्व काही चांगलं वाटतं. पण ब्रेकअप झाल्यावर मात्र चांगल्या गोष्टीही वाईट वाटू लागतात. बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडसोबत घालवलेला क्षण आणि आठवणी तर विसरणं कठीणच. त्यात जर त्यानं किंवा तिनं काही गिफ्ट दिलेले असतील तर विचारायलाच नको. ते गिफ्ट पण त्याची किंवा तिची आठवण करून देणार. पण जर तुम्हाला त्याच्या आठवणीतून बाहेर यायचं असेल, तर ते गिफ्ट्स तुम्ही द स्टेबलच्या ब्रेकअप बॉक्समध्ये दान करू शकता. त्याबदल्यात द स्टेबल तुम्हाला एक शॉट फ्री देईल! त्यानं किंवा तिनं दिलेलं एक गिफ्ट आणि त्याबदल्यात एक शॉट. आता ते गिफ्ट काहीही असू शकतं. बॅग, पेअर ऑफ शूज, एक्सनं दिलेला ड्रेस किंवा शर्ट, ज्वेलरी, बुक्स, गेम्स किंवा काहीही तुम्ही ब्रेकअप बॉक्समध्ये टाकू शकता.


'ब्रेकअप बॉक्स' देणार दुसऱ्याला आनंद

द स्टेबलनं आयोजित केलेली 'ब्रेकअप बॉक्स' ही संकल्पना एका चांगल्या हेतूसाठी राबवण्यात आली आहे. 'ब्रेकअप बॉक्स'मधील गिफ्ट 'एंजल फाऊंडेशन'च्या मुलांना देण्यात येणार आहेत. याशिवाय 'ब्रेकअप बॉक्स' या चॅलेंजसाठी सोशल मीडियावरील मित्र-मैत्रिणींना देखील तुम्ही टॅग करू शकता.



हेही वाचा

कॉफीतून प्या तुमचा फोटो! सेल्फिचिनोमध्ये हे शक्य आहे!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा