Advertisement

नोकरी जाण्याची चिंता तुम्हालाही सतावतेय का? मग 'या' टिप्स अमलात आणा

मोठ्या टेक कंपन्यांमध्ये नोकऱ्या कपातीमुळे तणाव निर्माण झाला आहे का? या टिप्स तुम्हाला लेऑफ चिंता दूर करण्यात मदत करतील

नोकरी जाण्याची चिंता तुम्हालाही सतावतेय का? मग 'या' टिप्स अमलात आणा
SHARES

Google ते Amazon आणि ShareChat ते Spotify पर्यंत अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी गेल्या काही दिवसांत आपल्या काही कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज एक नवीन टेक कंपनी टाळेबंदीची घोषणा करत आहे. या वातावरणात कोणत्याही कर्मचाऱ्याला नोकरीबद्दल चिंता वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकलो जाऊ की काय अशा चिंतेचा सामना करावा लागत आहे.

तज्ज्ञांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून टेक कंपन्यांमध्ये चिंतेचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. अनिश्चित भविष्य, उत्पन्नाचा स्त्रोत बंद होण्याची भीती, मासिक खर्च अशा अनेक बाबींची चिंता कर्मचाऱ्यांना सतावत आहे.

जानेवारी 2023 च्या आकडेवारीनुसार, दररोज जवळपास 3000 कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी गमावली आहे. या समस्येचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याने यापासून बचाव करण्यासाठी काही टिप्स उपयुक्त ठरू शकतात.

1. स्वतःसाठी एक दिनचर्या तयार करा आणि त्यानुसार सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हे तुम्हाला चिंताजनक विचारांपासून दूर राहण्यास मदत करेल.

2. अशा लोकांशी संपर्क साधा जे तुमचा आत्मविश्वास वाढवू शकतात आणि तुमचा भावनिक आधार ठरू शकतात.

3. शारीरिक व्यायामासाठीही वेळ काढा. अशावेळी तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक व्यायाम करा, ही शारीरिक ऊर्जा तुम्हाला सकारात्मक राहण्यास मदत करेल.

4. व्यायामासोबतच तुम्ही कोणते पदार्थ खातात याकडेही लक्ष देणे खूप गरजेचे आहे. आहारात शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये पुरवणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. हे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल.

5. ध्यान करा, यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळण्यास मदत होईल.

6. प्रत्येक दिवसाची सुरुवात स्वतःवर विश्वास ठेवून करा. हे सकारात्मक विचारांना चालना देण्यासाठी मदत करेल.हेही वाचा

मध्ये रेल्वेवरील माथेरान ठरले 2022 मधील राज्याचे आवडते पर्यटन स्थळ

हिवाळ्यात गूळ खाण्याचे अनेक फायदे, जाणून घ्या 10 मोठे फायदे

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा