Advertisement

सफर धारावीची


सफर धारावीची
SHARES

धारावीची आजपर्यंतची ओळख ही एक झोपडपट्टी म्हणूनच होती. मात्र, तेथे अनेक उद्योगही सुरू आहेत. यातल्या अनेक उद्योगांना भेटी देण्यासाठी तसंच धारावी नेमकी कशी आहे? हे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. पण तरीही मुंबईकरांचा धारावीकडे पाहण्याचा दृष्टीकोन काही बदलला नाही. लोकांचा हाच दृष्टीकोन बदलण्यासाठी 'स्लमगॉड्स टूर्स आणि ट्रॅव्हल्स'नं पुढाकार घेतला आहे.


सौजन्य

ब्रिस्क बिट

टूर्स आणि ट्रॅव्हल्स अंतर्गत धारावी परिसरात छोट्या टूर आयोजीत केल्या जातात. अडीच तास चालणाऱ्या या टूरमध्ये तुम्हाला धारावीतील गल्ल्या गल्ल्या फिरवल्या जातात. औद्योगिकरणाचं केंद्रस्थान म्हणून धारावी नावारुपाला येत आहे. छोटे-मोठे असे अनेक व्यवसाय धारावीत सुरू आहेत. याच व्यवसायांसंदर्भात आणि धारावीत राहणारे त्यांचं आयुष्य कसे जगतात, या विषयी लोकांना माहिती देण्यात येणार आहे.



'ब्रिस्क बिट' असं या टूरचं नाव आहे. या टूरसाठी तुम्हाला ६५० रुपये मोजावे लागतील. जर तुमचा ३ जणांचा ग्रुप असेल तर तुम्हाला ३९०० रुपये मोजावे लागतील. यामध्ये ते तुम्हाला रिसायकलिंग करणारी कंपनी, खारी-बिस्कीट बनवणाऱ्या बेकरीज, कुंभारवाडा या ठिकाणी भेट देता येणार आहे. याशिवाय कामाठीपुरा आणि धोबी घाट या परिसराला देखील तुम्हाला भेट देता येणार आहे.



धारावीत फेरफटका मारण्याची तुमची इच्छा आहे. पण सुरक्षेच्या कारणास्तव तुम्ही कधीच त्या परिसरात पाऊल ठेवले नाही. पण आता टूर आणि ट्रॅव्हल्सअंतर्गत तुम्ही धारावीत भटकंती करू शकता.



हेही वाचा

खारदांडातल्या घरांनी कात टाकली!




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा