Advertisement

गड-किल्ल्यांवर आधारित व्हिडिओग्राफी, छायाचित्रण स्पर्धा, आदित्य ठाकरे यांची घोषणा

राज्यातील किल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे सोशल मिडीयावर व्हिडिओग्राफी व छायाचित्रणाची स्पर्धा आयोजीत केली आहे.

गड-किल्ल्यांवर आधारित व्हिडिओग्राफी, छायाचित्रण स्पर्धा, आदित्य ठाकरे यांची घोषणा
SHARES

राज्यातील किल्ल्यांच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे सोशल मिडीयावर व्हिडिओग्राफी व छायाचित्रणाची स्पर्धा आयोजीत केली आहे. ८ ते २२ जानेवारी २०२० या कालावधीत गड–किल्ल्यांवर आधारित ही स्पर्धा होणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली.

आदित्य ठाकरे यांच्याकडं पर्यटन व पर्यावरण, राजशिष्टाचार खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सोमवारी त्यांनी पदाचा कार्यभार सांभाळत पहिला निर्णय घेत या स्पर्धेची घोषणा केली. राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश–विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे, सर्वसामान्यांमध्ये गड–किल्ल्यांबाबत आकर्षण व आवड निर्माण करणे, तसेच पर्यटक व अभ्यागत यांना या गड–दुर्ग किल्ल्यांबाबतची ऐतिहासिक माहिती करुन देणे हा या स्पर्धेच्या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.

अशी असेल ही स्पर्धा

ही स्पर्धा व्हिडिओग्राफी व छायाचित्रण प्रकारात, खुली श्रेणी व व्यावसायिक श्रेणी या दोन विभागात असेल. छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफीची आवड असलेल्या लोकांसाठी खुल्या गटातील स्पर्धा आहे.

खुली श्रेणी

पारितोषिक - पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये आणि १० विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपये

व्यावसायिक श्रेणी

छायाचित्रण - पहिल्या तीन विजेत्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये आणि दहा विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये पारितोषिक राहील.

व्हिडिओग्राफी - प्रथम पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक पंच्याहत्तर हजार रुपये व तृतीय पारितोषिक पन्नास हजार रुपये असेल. दहा विशेष उल्लेखनीय स्पर्धकांसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पारितोषिक राहील.

#MaharashtraTourismContest आणि #MaharashtraTourism या हॅशटॅगसह हे फोटो पोस्ट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. यासाठी  पर्यटन विभागाचे  @Maharashtra TourismOfficial हे फेसबूक पेज आणि @MaharashtraTourismofficial हे इन्स्टाग्राम पेज फॉलो करणं गरजेचं आहे.



हेही वाचा -

माणदेशी महोत्सव मुंबईत ९ जानेवारीपासून

दशकपूर्ती : गेल्या १० वर्षात या '८' रेस्टो आणि कॅफेंनी बदलली खाद्यसंस्कृती





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा