Advertisement

'WhatsApp Update' नवे फीचर आले, जाणून घ्या डिटेल्स

भारतासह जगभरात WhatsAppचे बरेच यूझर्स असून, आता या यूझर्ससाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता WhatsApp अपडेट झाला आहे.

'WhatsApp Update' नवे फीचर आले, जाणून घ्या डिटेल्स
SHARES

भारतासह जगभरात WhatsAppचे बरेच यूझर्स असून, आता या यूझर्ससाठी महत्वाची बातमी आहे. कारण आता WhatsApp अपडेट झाला आहे. या नव्या अपडेटनुसार, युझर्सचा चॅटिंग अनुभव आधीच्या तुलनेत आणखी चांगला करण्यासाठी एक खास अपडेट आणले गेले आहे. या नव्या अपडेटच्या मदतीनं त्या कॉन्टॅक्ट्स चॅटला लपवू शकता येईल. ज्यांच्यामुळं तुम्हाला त्रास होतो. कंपनी युजर्संना आर्काइव चॅट्सचं ऑप्शन देत आहे. परंतु, या चॅट्सला कायमस्वरूपी लपवू शकता येणार नाही.

आर्काइव करण्यात आलेल्या चॅट्स युजरच्या चॅट लिस्ट मध्ये सर्वात खाली पोहोचतात. परंतु, नवीन मेसेज आल्यानंतर ते पुन्हा टॉपवर दिसतात. आता व्हॉट्सअॅप जे नवीन फीचर आणत आहे. त्याच्या मदतीने तुम्ही नको असलेल्या कॉन्टॅक्ट्सच्या चॅटपासून मुक्तता मिळवू शकतात. याचं खास वैशिष्ट्यं म्हणजे तुम्हाला या कॉन्टॅक्टला ब्लॉक करण्याची गरज पडणार नाही.

WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने आता इरिटेटिंग चॅट्सला चॅट लिस्ट मध्ये लपवण्याचे फीचर रोलआउटच करणं सुरू केलं आहे. कंपनीच्या या फीचरचं खास वैशिष्ट्यं म्हणजे आता आर्काइव चॅट आल्यावर चॅट लिस्टमध्ये लपवता येतील. नवीन फीचरचं नाव New Archive आहे. हे अँड्रॉयडसाठी व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन 2.21.11.1 सोबत रोलआउट केलं जात आहे.

जर तुम्ही व्हॉट्सअॅप बीटा टेस्टर आहे. तर तुम्हाला या सेटिंग्स मध्ये जाऊन चॅट्स ऑप्शनमध्ये देण्यात आलेल्या Keep Chats Archived वर टॅप करून अॅक्सेस करू शकता. या ऑप्शनला ऑन केल्यानंतर नको असलेले चॅट्स आर्काइव किंवा म्यूट होतील. नवीन मेसेज आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा दिसणार नाही. कंपनी या फीचरची बीटा टेस्टिंग करीत आहे.हेही वाचा -

मुंबई महापालिकेत विविध पदांच्या १८५ जागांसाठी भरती

चक्रीवादळानंतरही मुंबईत पावसाच्या हलक्या सरी


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा