Advertisement

'या' ठिकाणी पाहा लुकलुकणाऱ्या काजव्यांचा नेत्रदीपक सोहळा


'या' ठिकाणी पाहा लुकलुकणाऱ्या काजव्यांचा नेत्रदीपक सोहळा
SHARES

उन्हाळा सरतानाचे दिवस असतात काजवे दिसण्याचे. मुंबईसारख्या शहरात कुठे काजवे दिसणार. त्यासाठी गावचा रस्ता धरायला हवा. चोहोबाजूला पसरलेल्या मिट्ट काळोखामध्ये मनमुराद उडणाऱ्या लुकलुकत्या काजव्यांचा सोहळा अनुभवायला कुणाला नाही आवडणार? निसर्गदेवताच जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर आला आहे की काय, अशी जाणीव मनात चमकून जाते


सौजन्य

काळोख्या रात्री लुकलुकणारे काजवे पाहायला मिळणं मुंबईकरांसाठी तसं दुर्मिळच. पण अशी संधी तुम्हाला मुंबईजवळ असणाऱ्या निसर्गरम्य स्थळांवर मिळू शकतेजंगलांमध्ये हजारोच्या संख्येने मुक्तपणे वावरणाऱ्या या लुकलुकणाऱ्या चांदण्यांचा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी अनेक गावांमध्ये काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतोभंडारदरामुरशेतपांजरेउडदावणेकोलंटेंभे या आदिवासी खेड्यांच्या शिवारात तसेच रंधा धबधब्याजवळ हजारो झाडे लक्षावधी काजव्यांनी भरलेली असतातआम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांची नावं सांगणार आहोत.


सौजन्य


राजमाची

राजमाची हे ठिकाण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. लोणावळा स्थानकापासून १६ किलोमीटरवर असणाऱ्या राजमाची गावात तुम्हाला काजवे पाहता येतील. 'ट्रेक इंडिया' या ग्रूपतर्फे ९ जून, १६ जून आणि २३ जून या दिवशी राजमाची ट्रेकचं आयोजन केलं आहे. यासाठी तुम्हाला ५०० रुपये देऊन तिकीट बुकिंग करावी लागेल. अधिक माहितीसाठी त्यांच्या फेसबुक पेजला भेट देऊ शकता.


पुरुषवाडी

मुंबईपासून पुरुषवाडी हे गाव १९० किलोमीटर अंतरावर आहे. कसाऱ्याजवळील पुरुषवाडी इथं अनेक नाइट कॅम्प जातात. काजव्यांनी भरलेली झाडं यासाठीच पुरुषवाडी ही जागा प्रसिद्ध आहे. 'ग्रासरुट' या संस्थेमार्फत इथं अनेक सहली आयोजित केल्या जातात. याच संस्थेनं हे गाव दत्तकदेखील घेतलं आहे. ३० जूनपर्यंत तुम्हाला इथल्या जंगलांमध्ये काजवे पाहता येतील. पुरुषवाडीला जाण्यासाठी कसारा स्टेशनवरून जीप किंवा बसने पुरुषवाडीला जाता येतं. अधिक माहितीसाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा.


कोडाण्याच्या गुहा

लोणावळा परिसरात काजवे पाहण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे कोंडाण्याच्या गुहा. मुंबईपासून दोन तासाच्या अतरावर कोंडाणाच्या गुहा आहेत. कोंडाण्याच्या या गुहांमध्ये काजव्यांचे चांगले दर्शन घडते. 'ट्रॅवल ट्रिकोण' तर्फे ९ आणि १० जून असे दोन दिवस काजवे पाहण्यासाठी खास ट्रेक नेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा.



पेठचा किल्ला (कोथळी गडाजवळ)

मुंबईपासून ९० किलोमीटरवर असणाऱ्या कोथळी गडाच्या पायथ्याशी असणारं गाव म्हणजेच अंबिवली गाव. या गावापासून जवळच असणाऱ्या कोथळी गडाजवळ काजवे पाहता येतील. 'पी. . के ट्रोप्स' या संस्थेतर्फे काजवे दाखवण्यासाठी एक खास ट्रेक आयोजित करण्यात आला आहे. १६ आणि १७ जूनला हा ट्रेक आयोजित करण्यात आला आहेअधिक माहितीसाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करा.


भंडारदरा

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात भंडारदरा हे गाव आहे. भंडारदरा इथं बहुसंख्य काजवे काही विशिष्ट झाडांवर आढळून येतात. त्यांच्या लयबद्ध लुकलुकण्यानं अंधारातही प्रकाशाचा भास होतोतुम्हालादेखील हे दृश्य अनुभवायचं असेल तर 'मुंबई ट्रॅव्हलर्स' तर्फे आयोजित काजवा फेस्टिव्हलला नक्की भेट द्या. १७ आणि १८ जून असे दोन दिवस भंडारदारा इथं कँपिंगचं आयोजन केलं आहेअधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.

कव्हर फोटो सौजन्य


हेही वाचा

'इथं' आहे फुलपाखरांचं रंगीबेरंगी विश्व!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा