पल्लवी जोशीच्या पतीनं महाविकासआघाडीला संबोधलं 'गुंडा पार्टी', नेटकरी संतापले

विवेक अग्नीहोत्रीनं ट्वीट करत महाविकासआघाडीवर टीका केली. सध्या सोशल मीडियावर त्याच्या ट्वीटची जोरदार चर्चा आहे. ट्वीटरवर त्यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवप्रेमींनी आणि मराठमोळ्या जनतेनं जोरदार विरोध केला आहे.

SHARE

महाराष्ट्रात स्थापन होणाऱ्या सत्तेविषयी सोशल मीडियाद्वारे अनेक जण आपलं मत मांडत आहेत. मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीच्या पतीनं देखील महाराष्ट्रच्या सत्ता स्थापनेबद्दल आपलं मत मांडलं आहे. पण ज्याप्रकारे त्यांनी ट्वीट केलं आहे त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आलेत

पल्लवी जोशी यांचा पती, बॉलिवूड दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्रीनं ट्विट करत म्हटलंय की, ‘मला असं वाटतं की ते मुख्यमंत्री झाल्यानंतर शहरांची नावं बदण्यास सुरुवात करतील. मराठी माणूस आणि यांसारख्या विषयांवर मूर्खासारखे निर्णय घेण्यात येतील. आता माझ्यासारखे भय्या गुंडा पार्टीत सुरक्षित राहतील का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. एका चॅनलचा व्हिडिओ शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केल्याचं दिसतंय. 

सध्या सोशल मीडियावर त्याच्या ट्वीटची जोरदार चर्चा आहे. ट्वीटरवर त्यांनी केलेल्या वक्तव्याचा काहींनी जोरदार विरोध केला आहे. 
विवेक अग्निहोत्री सोशल मीडिया नेहमीच सक्रिय असतात. वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर ते आपलं मत मांडतात. नुकताच त्यांचा ‘द ताशकंत फाइल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विवेकनं त्यांच्या करिअरची सुरुवात ‘चॉकलेट’ चित्रपटानं केली. या व्यतिरिक्त त्यानं ‘धन धना धन गोल’ आणि ‘हेट स्टोरी’ चित्रपटांची निर्माती केली आहे.हेही वाचा

'सत्ता आली पण पत्ता गेला', सुमीत राघवनचा शिवसेनेला टोला

किमान समान कार्यक्रम ठरला, शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना ८० टक्के आरक्षण


संबंधित विषय
ताज्या बातम्या