'जिना हाऊस जमिनदोस्त करून राज्याचे सांस्कृतिक केंद्र बनवावे'

 Malabar Hill
'जिना हाऊस जमिनदोस्त करून राज्याचे सांस्कृतिक केंद्र बनवावे'

मुंबई - मलबार हिलमध्ये जिना हाऊस जमिनदोस्त करुन राज्य सरकारच्या ताब्यात देण्यात यावे आणि राज्याचे सांस्कृतिक केंद्र बनवावे अशी मागणी भाजापा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली. मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की मोहम्मद अली जिना हे देशप्रेमी नव्हते, तसेच त्यांच्यामुळे या देशाची फाळणी झाली होती. अशा व्यक्तीचे घर केंद्राने मंजूर केलेल्या नवीन शत्रू मालमत्ता विधेयकाच्या अंतर्गत ताब्यात घ्यावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे. जिना हाऊस 1936 साली दोन लाख रुपये खर्च करुन 2.5 एकरवर मोहम्मद अली जिना यांनी बनविले होते. काही काळासाठी युनायटेड किंगडम या देशाच्या उच्च आयोगाला चालविण्यासाठी देण्यात आले होते. पाकिस्तानकडून वेळोवेळी मागणी होत असते की जिना हाऊस पाकिस्तानच्या ताब्यात द्यावे जेणेकरुन पाकिस्ताचे उच्च आयोग सुरु करता येईल. मोहम्मद जिनाची कन्या दिना वाडिया यांनी भारतात राहणे पंसत केले होते. दिना वाडिया यांनी जिना हाऊससाठी न्यायालयीन लढाई लढली होती अशी माहितीही त्यांनी दिली.

Loading Comments