Advertisement

विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रसाद लाड यांचे पारडे जड, गुरुवारी मतदान

नारायण राणेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेतील जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून प्रसाद लाड तर काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने निवडणूक लढवत आहेत. मात्र शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे पारडे जड मानले जात आहे.

विधान परिषद पोटनिवडणुकीत प्रसाद लाड यांचे पारडे जड, गुरुवारी मतदान
SHARES

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आपल्या विधान परिषद आमदारकीचा देखील राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या जागेसाठी गुरुवारी निवडणूक होत आहे. या जागेवर भाजपाकडून प्रसाद लाड तर काँग्रेसकडून माजी आमदार दिलीप माने निवडणूक लढवत आहेत. मात्र शिवसेनेने प्रसाद लाड यांना पाठिंबा दिल्यामुळे या निवडणुकीत प्रसाद लाड यांचे पारडे जड मानले जात आहे.


काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक

दरम्यान, या निवडणुकीमध्ये आमदारांची मते फुटू नयेत, तसेच आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची आणि आमदारांची बैठक होणार आहे. संध्याकाळी सहा वाजता वाय. बी. चव्हाण सभागृहात ही बैठक पार पडेल.


असे आहे पक्षीय बलाबल

विधानसभेत भाजपाचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३, अपक्ष ७, एमआयएमचे २ तर; सपा, रासपा, मनसे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि भारिपचे प्रत्येकी एक आमदार आहेत. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ मतांचा आकडा पार करावा लागणार आहे. भाजपाचे प्रसाद लाड यांना शिवसेना आणि अपक्षांचा पाठिंबा असून, लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे असल्याने विरोधकांची काही मते फोडण्यात त्यांना यश मिळू शकते.हेही वाचा

मला निवडून येण्याची चिंता नव्हती, पण भाजपाने विश्वास ठेवायला हवा होता- राणे


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा