Advertisement

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणारच - मुख्यंमत्री

बुलेट ट्रेनचे तिकीट हे रेल्वे तिकिटाएवढेच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पुनर्विचाराचा प्रश्न गौण असून ती होणारच, असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होणारच - मुख्यंमत्री
SHARES

ज्या ज्या देशात बुलेट ट्रेनचे प्रकल्प झाले आहेत, तिथल्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ झाली आहे. प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या माध्यमातून सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) वाढ होणार असून हा प्रकल्प राज्याला प्रगतीपथावर नेणारा असल्याचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधान परिषदेत लक्षवेधीला उत्तर देताना सांगितले.


अर्धा टक्क्याने जपानचे कर्ज

सदस्य संजय दत्त यांनी मुंबई-अहमदाबाद प्रस्तावित बुलेट ट्रेन विषयीची लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. दळणवळण व्यवस्था (मोबिलिटी) हा विकासाचा मार्ग आहे. जिथे जिथे फास्ट ट्रेन गेली आहे, तिथल्या विकासदरात वाढ झाली आहे. याच दृष्टीने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी जपान सरकार कर्ज देणार आहे. 50 वर्षांसाठी जपान सरकारने अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी दराने बुलेट ट्रेनसाठी कर्ज दिले आहे. सुरुवातीची 20 वर्षे कुठलेही व्याज द्यावे लागणार नाही. भविष्यात मुंबई-पुणे आणि राज्यातील इतर ठिकाणीही बुलेट ट्रेन सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


बुलेट ट्रेनचं तिकिट विमानाइतकंच

मुंबईतल्या लोकलसाठी पाहिल्यांदाच अर्थसंकल्पात 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षा, उपाययोजना यासाठी हे पैसे देण्यात आले आहेत. बुलेट ट्रेनचे तिकीट हे रेल्वे तिकिटाएवढेच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या पुनर्विचाराचा प्रश्न गौण असून ती होणारच, असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.



हेही वाचा

वांद्रे कुर्ला संकुलात बुलेट ट्रेनचं स्थानक


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा