Advertisement

सध्या तरी ट्रेन सुरू होणार नाहीच, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

सध्याच्या स्थितीत तरी ट्रेन सुरू होणार नाहीच, असं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिलं. फेसबुक लाइव्हवरून जनतेशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली.

सध्या तरी ट्रेन सुरू होणार नाहीच, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
SHARES

कोरोनाचा संसर्ग (coronavirus) रोखण्यासाठी देशभरात लागू करण्यात आलेला लाॅकडाऊन ३ मे रोजी संपणार की नाही? महाराष्ट्रातून घरी जाण्यासाठी ट्रेन (special trains) उपलब्ध होणार की नाही? याकडे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अडकलेल्या परप्रांतीयांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यावर बोलताना सध्याच्या स्थितीत तरी ट्रेन सुरू होणार नाहीच, असं स्पष्टीकरण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी दिलं. फेसबुक लाइव्हवरून जनतेशी साधलेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली.

परप्रांतीय उतावीळ 

महाराष्ट्रात जागोजागी काही लाख परप्रांतीय मजूर (migrant workers in maharashtra) अडकून पडले आहेत. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड इ. राज्यातील मजुरांची संख्या मोठी आहे. सरकारने या सर्व मजुरांची राहण्याची, खाण्यापिण्याची आणि वैद्यकीय सुविधेची व्यवस्था केली असली, तरी हे मजूर आता काही केल्या घरी जाण्यास उतावीळ झाले आहेत. महाराष्ट्रातील उद्योगधंदे लाॅकडाऊनमुळे (lockdown) ठप्प झाल्याने त्यांच्या हाताला काम उरलेलं नाही. खिशात पैसे नसल्याने हे मजूर द्विधा मन: स्थितीत सापडले आहेत. 

हेही वाचा - कोटा शहरात अडलेल्या महाराष्ट्रातील १८०० विद्यार्थ्यांना परत आणणार

ट्रेन सोडणं धोक्याचं

अशा परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रातून आपापल्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची विनंती याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. मात्र सध्याच्या स्थितीत परप्रांतीयांसाठी रेल्वे सोडणं धोक्याचं ठरू शकतं, त्याऐवजी त्यांच्यासाठी आहे त्या ठिकाणीच काम उपलब्ध करून देणंच योग्य असल्याचं मत यावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. 

केंद्राशी चर्चा सुरू

यासंदर्भात पुन्हा एकदा बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातून आपापल्या गावी जाण्यास इच्छुक असलेल्या परप्रांतीयांना सोडता यावं यासाठी सातत्याने केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे. यातून लवकरच मार्ग निघेल. परंतु सध्या तरी ट्रेन सुरू होणार नाहीय. कारण चुकूनही गर्दी झालेली चालणार नाही. गर्दी झाली, तर पुन्हा एकदा निर्बंध लादावे लागतील. त्यामुळे केंद्राची परवानगी मिळाली की प्रत्येकाला आपल्या घरी जाण्याची व्यवस्था महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येईल, तोपर्यंत शांतपणे आहे त्या ठिकाणी राहा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा