Advertisement

गुन्हेगारांना सरकार धडा शिकवेल, भिडेंच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर

ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर सरकारकडून कडक कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही, असं जयंत पाटील म्हणाले.

गुन्हेगारांना सरकार धडा शिकवेल, भिडेंच्या प्रश्नावर जयंत पाटलांचं उत्तर
SHARES

ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहे, अशांना हे सरकार नक्कीच धडा शिकवेल. त्यामुळे कुणीही गैरसमज पसरवू नयेत. यासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि नव्या सरकारमधील मंत्री जयंत पाटील म्हणाले.

हेही वाचा- बुलेट ट्रेन म्हणजे पांढरा हत्ती, छगन भुजबळ यांची भूमिका

एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी संभाजी भिडे यांची पाठराखण केल्याबद्दल जयंत पाटील यांना टोमणा हाणला होता. गेल्या सरकारने भीमा कोरेगाव आंदोलनादरम्यान अनेक आंदोलनकर्त्यांवर हेतूपरस्पर गुन्हे नोंदवले होते. या दरम्यान झालेल्या दंगलीला संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे जबाबदार असून त्यांच्यावर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी दलवाई यांनी केली होती. तसंच जयंत पाटील यांनी भिडे यांची यावेळेस पाठराखण करू नये, असंही दलवाई म्हणाले होते.

हेही वाचा- भीमा कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हेही मागे घ्या, राष्ट्रवादीची मागणी

त्यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले, आरे, नाणार आणि भीमा कोरेगाव आंदोलनात ज्यांच्यावर छोटे गुन्हे दाखल आहे. त्यांच्याबद्दल सरकार नक्की विचार करेल. पण ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर सरकारकडून कडक कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठिशी घालण्यात येणार नाही. अजून तरी कुठलंही खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा