Advertisement

मोदी लाटेशिवाय तरतील का गजानन किर्तीकर ?

उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर संजय निरूपम विरूद्ध गजानन किर्तीकर यांच्यात सामना रंगणार आहे. गजानन किर्तीकर यांना पुन्हा एकदा शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. सलग दुसऱ्यांदा किर्तीकर या मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत.

मोदी लाटेशिवाय तरतील का गजानन किर्तीकर ?
SHARES

उत्तर पश्चिम मुंबईच्या लोकसभेच्या जागेवर संजय निरूपम विरूद्ध गजानन किर्तीकर यांच्यात सामना रंगणार आहे. गजानन किर्तीकर यांना पुन्हा एकदा शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. सलग दुसऱ्यांदा किर्तीकर या मतदारसंघातून लोकसभा लढवणार आहेत. गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे निष्ठावंत नेते मानले जातात आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते परिचीत आहेत. किर्तीकर यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार संजय निरूपम यांचं आव्हान असणार आहे.


मतदारसंघाचा इतिहास
२००४ साली या लोकसभा जागेची पुनर्रचना करण्यात आली. १९९९ आणि २००४ साली सुनील दत्त हे या ठिकाणाहून निवडून आले होते. पुनर्रचनेनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत या ठिकाणाहून निवडून आले. परंतु २०१४ साली मोदी लाटेमध्ये किर्तीकर लोकसभेवर निवडून गेले.

निष्ठावंत नेते
दिवंगत बाळासाहेब ठाकरेंपर्यंत थेट पोहोचणाऱ्या नेत्यापैकी ते एक आहेत. १९९० ते २००९ या कालावधीत ते मालाड विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले होते. तर युतीच्या सरकारमध्ये त्यांनी गृहमंत्रीपदही भूषवलं होतं. २०१४ साली पार पडलेल्या निवडणुकांमध्ये त्यांनी गुरूदास कामत यांचा १ लाख ८३ हजार मतांनी पराभव केला होता. तसंच त्यांनी स्थानिकांना नोकरी मिळवून देण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती.

उत्तर भारतीयांवरही पकड
किर्तीकर यांना सर्वच समाजाचा पाठिंबा आहे. त्यातच उत्तर भारतीय समाजाचाही त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे. २०१४ मध्ये त्यांना मिळालेल्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय मतदारांचाही समावेश होता. याव्यतिरिक्त अनेक उत्तर भारतीय संघटनांनीही त्यांना पाठिंबा दिला होता.


#MLviews

शिवसेनेचे गजानन किर्तीकर कुठलाही गाजावाजा न करता मोदी लाटेत सहज जिंकून आले होते. परंतु यावेळच्या परिस्थितीत कमालीचा बदल झालाय. यंदा त्यांच्यासमोर निरूपम यांचं तगडं आव्हान असणार आहे. उत्तर भारतीयांमध्ये लोकप्रिय असलेल्या निरूपम यांना मराठी मतं मिळाल्यास किर्तीकरांना ही निवडणूक जड जाऊ शकते.



हेही वाचा- 

अडथळ्यांच्या शर्यतीवर अरविंद सावंत करतील का मात?

शिवसेनेचा गड असणाऱ्या कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंचा विजय सहजसोपा?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा