पुरोहित-पठाण संघर्ष लुटूपुटूचा?

Mumbai
पुरोहित-पठाण संघर्ष लुटूपुटूचा?
पुरोहित-पठाण संघर्ष लुटूपुटूचा?
पुरोहित-पठाण संघर्ष लुटूपुटूचा?
See all
मुंबई  -  

भारतीय जनता पार्टीचे आमदार राज पुरोहित आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांच्यामध्ये ‘वंदे मातरम्’ चा जयघोष करण्यावरून विधानभवन परिसरात जुंपल्याचं दृश्य प्रसारमाध्यमांनी सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं. माध्यमांच्या कॅमेऱ्यांना साक्षी मानत एकमेकांना खाऊ की गिळू नजरेने पाहणारे, प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी घोषणाबाजी करणारे राज पुरोहित आणि वारिस पठाण यांचं भांडण लुटूपुटूचं होतं की काय? असं वाटायला भाग पाडणारी छायाचित्रं ‘मुंबई लाइव्ह’ला मिळाली आहेत.


खुन्नस-खुन्नस की तुझ्या गळा, माझ्या गळा...?

कुलाबा मतदारसंघातून आमदारकी जिंकणारे राज पुरोहित आणि भायखळ्याचे आमदार वारिस पठाणहे मुईन अश्रफसोबत  छायाचित्रात एकत्र दिसत आहेत. अश्रफची ओळख नागपाडा परिसरात ‘बाबा बंगाली’ नावाने आहे. गंभीर बाब म्हणजे पोलीस रेकॉर्डनुसार, ही व्यक्ती आझाद मैदान दंगलप्रकरणातली ‘आरोपी क्रमांक सात’ आहे. तर या व्यक्तीसोबत छायाचित्रात दिसणाऱ्या पुरोहित आणि पठाण यांच्या चेहरा किंवा देहबोलीत कोणताही तणाव दिसत नाही. कोणते पुरोहित आणि पठाण खरे? विधानभवन परिसरात एकमेकांची कॉलर पकडायची बाकी ठेवणारे? की एकमेकांसोबत सहज वावर राखणारे? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही.  का जुंपली पुरोहित आणि पठाण यांच्यात?

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात ‘वंदे मातरम म्हणा आणि कदापि म्हणणार नाही’, अशा हटवादी मुद्द्यांवरून भाजपा, शिवसेना विरुद्ध समाजवादी पार्टी, एमआयएम यांच्यात शुक्रवारी चांगलीच जुंपली. या वादाचे पडसाद सभागृहाबाहेर पण विधानभवन परिसरातच पडले.राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ‘वंदे मातरम्’  न म्हणण्यामागची आपली भूमिका सपाचे अबू आजमी आणि एम आय एमचे वारिस पठाण पटवून देताना दिसत होते.त्याचवेळी भाजपा आमदार राज पुरोहित आणि अनिल गोटे तिथे आले आणि त्यांनी आजमी तसंच पठाण यांची हुर्यो उडवली.


‘देश में रहना होगा, तो वंदे मातरम् कहना होगा’ या भाजपा आमदारांच्या घोषणेला ‘भारतमाता की जय’चं प्रत्युत्तर दिलं गेलं. देशप्रेम दाखवण्याच्या बाबतीत ‘हमसे बढ़कर कौन’ हे ठसवण्याचा प्रयत्न केला गेला. राज पुरोहित आणि वारिस पठाणच्या घोषणायुद्धात काही जणांनी मध्यस्थी करावी लागली. जातानाही दोघं एकमेकांविरोधात तावातावाने बोलत होते.विचारांची लढाई?

मुंबई लाइव्हने दोन्ही नेत्यांशी संपर्क साधला. विशेष म्हणजे एरवी एकमेकांच्या धोरणांवर टिका करणारे दोन्ही नेत्यांची मतं या छायाचित्राच्या मुद्द्यावर मात्र जुळताना दिसली.


माझी वारिस पठाण यांच्यासोबत सैद्धांतिक लढाई आहे. कुठल्यातरी कार्यक्रमात आम्ही एकत्र आलो, याचा अर्थ आमच्यात मैत्री आहे असा नाही. ‘वंदे मातरम्’ म्हणण्यास नकार देण्याच्या त्यांच्या वृत्तीचा मी निषेध करतो. पण म्हणून मी त्यांच्यावर बंदूक रोखणार का? आजही मी वारिस पठाण आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात आहे. एमआयएमला कुलुप लावा, असं मी आजही बोलतो.

राज पुरोहित, आमदार, भाजपा


तुम्ही ज्या फोटोबद्दल बोलताय तो फोटो एका उरुसदरम्यान काढला गेला आहे. तिथे मी उपस्थित होतो. माझ्यासोबत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी आदी पक्षांचे नेतेही उपस्थित होते. राज पुरोहितसुद्धा होते. पण एका कार्यक्रमाला एकत्र आल्याने आम्ही मित्र ठरत नाही.

वारिस पठाण, आमदार, एमआयएम  

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.