Advertisement

काय होणार फेरीवाल्यांचं? मनसेचं शनिवारपासून खळ्ळखट्याक!


काय होणार फेरीवाल्यांचं? मनसेचं शनिवारपासून खळ्ळखट्याक!
SHARES

एल्फिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप मोर्चा काढत फेरीवाल्यांना पुढच्या 15 दिवसांत हटवा, अन्यथा आमच्या स्टाईलने फेरीवाले हटवू, असा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला होता. राज ठाकरेंनी दिलेली ही 15 दिवसांची मुदत शनिवारी संपत आहे. त्यामुळे आता फेरीवाल्यांना मनसेच्या खळ्ळ-खट्याकचा समना करावा लागाणार आहे, असेच काहीसे चित्र आहे.


पुन्हा परिस्थिती जैसे थे

राज ठाकरे यांनी इशारा दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी फेरीवाले उठले होते. त्यामुळे रेल्वे स्टेशन परिसरातील रस्ते मोकळे झालेले पाहायला मिळाले. मात्र दिवाळीत फेरीवाल्यांनी पुन्हा आपले बस्तान बसवल्याने सर्वच रेल्वे स्थानकाबाहेरचा परिसर फेरीवाल्यांनी गजबजून गेला आहे.

साहेबांनी जो इशारा दिला त्यानुसार आमचे कार्यकर्ते पुढे जातील. प्रशासनाने दखल घेत सुरुवातीला फेरीवाले हटवले होते. जर रेल्वे प्रशासन आणि पालिका प्रशासनाने योग्य काम केले तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही. अन्यथा साहेबांनी इशारा दिलाच आहे.

नितीन सरदेसाई, मनसे, नेता


काय इशारा दिला होता राज ठाकरेंनी?

मेट्रो ते चर्चगेट असा मुंबईकरांचा संताप मोर्चा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 5 ऑक्टोबरला रोजी काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर झालेल्या सभेत राज यांनी केलेल्या भाषणात पंधरा दिवसात रेल्वे पूल, तसेच रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर आणि स्थानकाबाहेर असलेल्या फेरीवाल्यांना पंधरा दिवसात प्रशासनाने हटवावे, अन्यथा सोळाव्या दिवाशी मनसे फेरीवाल्यांना हटवेल, असा इशारा दिला होता. तर सोळाव्या दिवशी जे काही होईल त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, असेही राज यांनी ठणकावले होते.



हेही वाचा

फेरीवाल्यांचं काय होणार माहिती आहे?


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा