भुजबळ वळवतील का अजितदादाचं मन?

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यानुसार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी भुजबळ त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले आहेत.

SHARE

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांचं मन वळवण्याची जबाबदारी आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर टाकण्यात आली आहे. त्यानुसार अजित पवार यांची भेट घेण्यासाठी भुजबळ त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले आहेत. 

हेही वाचा- भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर- संजय राऊत

एका बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू असताना, अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांनी सह्या केलेल्या पत्राचा गैरवापर केला. हे पत्र राज्यपालांना सादर करत भाजपला पाठिंबा दिला आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. 

अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे १० ते ११ आमदार उपस्थित होते. परंतु पूर्वकल्पना न देता राजभवनात नेलेले सर्व आमदार संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

हेही वाचा- अजित पवारांच्या गटाला १२ मंत्रीपदं,१५ महामंडळ?

त्यामुळे एकाकी पडलेल्या अजित पवार यांचं मन वळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. सुरूवातीला धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांनी अजित पवार यांना भेटून त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील त्यांना परत येण्याचं आवाहन केलं. पण त्याला यश मिळू शकलं नाही. अखेर ही भुजबळ यांना त्यांच्याकडे पाठवण्यात आलं आहे. त्यांच्या जोडीला रामराजे निंबाळकर आणि दिलीप वळसे पाटील हे नेते देखील आहेत.हेही वाचा-

राज्यपालांचा अधिकार 'या' ५ राज्यात भाजपासाठी 'गेमचेंजर' बनला

या कारणांमुळे अजित पवारांनी भाजपला साथ दिलीसंबंधित विषय
ताज्या बातम्या