Advertisement

प्लॅस्टिकच्या घोड्यावर बसणाऱ्या नटीला पद्मश्री...- महापौर

‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा महापौरांनी समाचार घेतला.

प्लॅस्टिकच्या घोड्यावर बसणाऱ्या नटीला पद्मश्री...- महापौर
SHARES

प्लॅस्टिकच्या घोड्यावर बसून झाशीची राणी सिनेमा करणाऱ्या नटीला पद्मश्री पुरस्कार देणं हा अखंड हिंदुस्थानचा अपमान आहे. तिच्यावर कारवाई करून विषय संपवा, अशी मागणी करत त्यांनी कंगनावर निशाणा साधला आहे.

‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ या कंगना राणावतने केलेल्या वक्तव्याचा सोमवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी खरमरीत समाचार घेतला.

कंगना दर तीन महिन्यांनी प्रसिद्धीच्या झोतात यायला बघते. ती जन्मली कुठे, रोजीरोटी कमवायला येते कुठे आणि इथं येऊन माझ्या मुंबईची आणि महाराष्ट्राची पाकिस्तानशी बरोबरी काय करते, अशा शब्दांत त्यांनी कंगनाला फटकारलं.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आपल्या देशासाठी, महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करलं ते एका समाजाचे नव्हते. सर्व जाती-धर्माचे होते. कंगनाचे बेताल वक्तव्य म्हणजे या साऱ्या आहुती दिलेल्या लोकांचा अपमान आहे. आपल्या देशात अनेक लोक आहेत. ते अतिशय चांगलं काम करतात. मात्र, हिच्यात काय टॅलेंट बघून पद्मश्री पुरस्कार दिला, हे मला समजत नाही. अशा नटीला पद्मश्री देणं हा अखंड हिंदुस्तानचा अपमान आहे.

महापौर पेडणेकर म्हणाल्या, कंगनाचा राजकीय, अराजकीय, सामाजिक सर्व स्तरातून निषेध होत आहे. माझी गृह राज्य विभागाला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी अशा बेताल मुलीवर लक्ष द्यावं. जी संपूर्ण संपूर्ण हिंदुस्थानचा अपमान करते. सर्व लोकांमध्ये फूट पाडते. ती नको त्या विषयात उगीच ढवळाढवळ करत असेल आणि आमच्या हुतात्म्यांचा अपमान करत असेल तर तिचा निषेध आपल्या या न्यायिक बाजूनं करावा लागेल. तिच्यावर कारवाई करून विषय संपवून टाकावा.



हेही वाचा

“इतिहासाचे ज्ञान कमी असल्यामुळे…”; वर्षा गायकवाड यांची कंगनावर टीका

वादग्रस्त वक्तव्यामुळे कंगनावर राजू शेट्टी संतापले, म्हणाले तिची औकात...

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा