Advertisement

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानेही केली जीम सुरू करण्याची मागणी

जीम तसंच फिटनेस क्लब सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने होऊ लागली आहे.

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यानेही केली जीम सुरू करण्याची मागणी
SHARES

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अजूनही जीम आणि फिटनेस क्लब सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. यामुळे मागील ५ महिन्यांपासून हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी हा व्यवसाय चालवणाऱ्यांचे प्रचंड हाल होत असल्याने जीम तसंच फिटनेस क्लब सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी सातत्याने होऊ लागली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे. (ncp mp supriya sule demands to open gym in maharashtra during unlock)

खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणं आवश्यक आहे. @CMOMaharashtra  राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनलाॅकाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत काही अटी शर्थींच्या आधारे राज्य सरकारने अनेक उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. बाजारपेठांसाठी असणारी सम-विषमची अट काढून टाकत बाजारपेठा दिवसभर सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. असं असूनही जीम आणि फिटनेस क्लब बंद असल्याने हा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. 

हेही वाचा - Raj Thackeray: जीम सुरू करा, बघू काय होतं ते- राज ठाकरे

जीम, फिटनेस क्लब सुरू करण्यासाठी साहित्य खरेदीसाठी अनेकांनी बँकांकडून कर्जे घेतलेली आहेत. अनेकांना बँकांच्या हप्त्यांसोबतच जागेचं नियमितपणे भाडं भरावं लागतं, वीज-पाणी बिल भरावं लागतं. मागील काही महिन्यांपासून जीम व्यावसायिकांनी आपल्या साचलेल्या मिळकतीतून हा खर्च केला, आपल्याकडील कर्मचाऱ्यांना हातभार लावला. परंतु आर्थिक क्षमता कमकुवत झाल्याने आता जीम व्यावसायिकांवरील कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. या व्यवसायावर अवलंबून कर्मचाऱ्यांचे आर्थिक हाल होऊ लागले आहेत. नियमीत व्यायाम करणारे शरीरसौष्ठवपटू, इतर खेळाडू यांच्या कसरतीतही खंड पडू लागला आहे. यामुळे जीम-फिटनेस क्लब सुरू करण्याची विनंती या व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

जीम मालक-चालकांनी काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन  त्यांच्यापुढे आपलं गाऱ्हाणं मांडलं होतं. त्यावेळेस राज ठाकरे यांनी कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचं पालन करून जीम उघडा, पुढं काय होईल ते बघून घेऊ, असा दिलासा जीम व्यावसायिकांना दिला होता. तर विधनसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जीम सुरू करण्याची मागणी केली होती. 

Read this story in English
संबंधित विषय