Advertisement

निलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली.

निलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड
SHARES

विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या निलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ही निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोऱ्हे यांचं अभिनंदन केलं. तर या निवडणुकीला आक्षेप घेत भाजपने कोर्टात धाव घेतली आहे. (shiv sena leader neelam gorhe elected as a deputy chairperson of vidhan parishad )

यासंबंधीचं प्रकरण न्यायालयात असल्याने उपसभापतीपदाची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षाकडून करण्यात आली होती. मात्र निवडणूक घेण्याचा सभापतीचा अधिकार असून तो न्यायालयीन कक्षेत येत नाही, असं सांगत सभापती रामराजे निंबाळकर यांनी ही निवडणूक घेतली. त्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांच्या सभात्यागानंतर आवाजी मतदानानंतर निलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली.

हेही वाचा - पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कोरोना चाचण्यांच्या अहवालाचा गोंधळ

 महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये नीलमताई स्वतः धावून जातात हे आपण पाहिलं आहे. त्यांची उपसभापतीपदी दुसऱ्यांदा निवड झाली असून त्यांच्या यशाची कमान अशीच उंचावत जावो, अशा शुभेच्छा यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

उपसभापतीपदाच्या निवडणुकीचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक घेऊन महाविकास आघाडी सरकारने लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशा शब्दांत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली.

यासंदर्भात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालयाने सरकारच्या महाभिवक्त्यांना बोलावून त्यांची भूमिका समजून घेतली आहे. आम्ही कोरोना, शेतकरी आत्महत्या, कायदा सुव्यवस्था, मराठा आरक्षणवर चर्चा करण्याची मागणी करूनही हे सगळे विषय बाजूला ठेवून राज्य सरकार विधीमंडळाचं कामकाज केवळ रेटून नेण्याचं काम करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या हक्कांची ही पायमल्ली असून म्हणूनच आम्ही सरकारचा निषेध करून सभात्याग केल्याचं प्रवीण दरेकर म्हणाले. यासंदर्भात पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख; अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा