Advertisement

माहुलमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा- आमदार सुनील प्रभू


माहुलमध्ये प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा- आमदार सुनील प्रभू
SHARES

चेंबूरजवळच्या माहुल आणि अंबापाडा भागातील रहिवाशांच्या आरोग्यावर रिफायनी कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे या सर्व रिफायनरी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.


मागण्यांकडे दुर्लक्ष

माहुलधील रिफायनरी कंपन्यांमुळे या भागात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. शिवाय या कंपन्यांतील पाणी थेट माहुल खाडीत सोडलं जात असल्याने या भागात जल प्रदूषणही होत आहे. परिणामी या सर्व प्रदूषणामुळे येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी करूनही सरकारकडून या मागण्यांची साधी दखलही घेण्यात येत नसल्याचं प्रभू म्हणाले.


न्यायालयात याचिका

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) आणि राष्ट्रीय हरित लवादा (एनजीटी)ने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर योग्य निर्णय होईपर्यंत कोणतीही पी.ए.पी. स्थलांतरीत करण्यास त्वरीत स्थगिती द्यावी. येथील प्रदूषणाबाबतची सखोल माहिती मागवून घेत, प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कोणते कायमस्वरुपी उपाय करता येईल, याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणीही प्रभू यांनी केली.



हेही वाचा-

गणेशोत्सवात आवाज कमीच ठेवा - उच्च न्यायालय

निवडणूक फंडासाठी प्लास्टिक धोरण, राज यांचा आरोप



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा