Advertisement

शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान?, संजय राऊतांचा भाजपला चिमटा

हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे की नाही याचं प्रमाणपत्र कुणी द्यायचं, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान?, संजय राऊतांचा भाजपला चिमटा
SHARES

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथविधीदरम्यान ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी नाराजी व्यक्त करत उदयनराजेंना समज दिली. यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे की नाही याचं प्रमाणपत्र कुणी द्यायचं, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपला चिमटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. (shiv sena mp sanjay raut questioned bjp mp udayanraje bhosale over oath taking controversy in rajya sabha)

नेमकं काय झालं?

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उदयनराजे यांनी शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा दिल्या. त्यावर, “हे राज्यसभेचं सभागृह नसून माझं दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही,” अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिली.

हेही वाचा - मुलाचं नाव शिवाजी ठेवण्याआधी साताऱ्यातून एनओसी घ्यायची का? जितेंद्र आव्हाडांचा उदयनराजेंना प्रश्न

भाजपवर टीका

या घटनेवरून शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपवर टीका सुरू झाली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलवरून यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. तर संभाजी भिडे यांच्या कडून सांगली सातारा बंदची अदयाप घोषणा नाही... असं आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवप्रतिष्ठानकडून उत्तर

राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये संभाजी भिडे यांचाही उल्लेख केल्याने शिवप्रतिष्ठानकडून राऊतांना उत्तर देण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे सांगली, सातारा आधीच बंद आहे, हे राऊत यांना माहीतही नाही का? देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला कुणाच्या परवानगीची गरज नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही आम्ही उदयनराजेंसाठी आंदोलने केली आहेत. उदयनराजेंच्या पाठिशी आम्ही कायम आहोत, असं प्रतिष्ठानने म्हटलं आहे.

हेही वाचा - Ram Mandir: अयोध्येचा रस्ताच शिवसेनेने तयार केलाय- संजय राऊत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा