Advertisement

मुनी आणि मनीमुळेच भाजपाचा विजय - संजय राऊत


मुनी आणि मनीमुळेच भाजपाचा विजय - संजय राऊत
SHARES

मुनी आणि मनी या दोन गोष्टींमुळेच भारतीय जनता पार्टीला मीरा भाईंदर महापालिकेत सत्ता मिळाल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. जैन धर्मगुरू नयन पद्मसागर महाराज यांनी भाजपाच्या विजयासाठी जो हिंसक प्रचार केला, तो व्यवस्थेला काळिमा फासण्याचा प्रकार असल्याचेही राऊत म्हणाले. ते बुधवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.


'हा तर आचारसंहितेचा भंग'

स्वतः ला मुनी म्हणवणाऱ्याने भाजपाचा प्रचार केला. हा आचारसाहितेचा भंग आहे. हा मुनी नसून राजकीय गुंड आहे. हा मुनी शिवसेना तसेच मराठी माणसाबद्दल द्वेश पसरवत होता अशी टीकाही राऊत यांनी यावेळी केली. मतांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुनीला भेटतात, त्यांच्या पायावर डोके ठेवतात, असे सांगत राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टार्गेट केले.


'हे तर भाईंदरचे लफंगे'

'यापुढे शिवसेनेच्या विरोधात एक शब्द उच्चारला तर, शिवसेना काय आहे? ते या मुनीला दाखवून देईल. जे आम्हाला धमक्या देत आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा लागेल. हे तर भाईंदरचे लफंगे आहेत', अशा शब्दांत राऊत यांनी टीका केली. 'हा अतिरेकी मुनी आहे. याला वेळीच ठेचले नाही, तर नवा झाकीर नाईक तयार होईल. हा जोकर आहे', असे देखील राऊत यावेळी म्हणाले.



हेही वाचा - 

आठ दिवसांत उसळलेल्या लाटा थांबतील - संजय राऊत

निकालानंतर सर्वांची बुबुळं बाहेर येतील - संजय राऊत


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा