Advertisement

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन
SHARES

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन झालं आहे. गुरुवारी दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ७४ वर्षीय पासवान मागील काही दिवसांपासून आजारी होते. दिल्लीच्या एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची बातमी मुलगा चिराग पासवान यांनी ट्वीटरवरुन दिली आहे.

चिराग पासवाननं ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. या फोटोत चिराग बाबांसोबत दिसत आहे. फोटोसोबत चिरागनं एक मेसेज शेअर करत ही दु:खद बातमी दिली. त्यानं लिहलं आहे की, 'पापा अब इस दुनिया मे नहीं है लेकिन आप मुझे पता है आप जहां भी है हमेशा मेरे साथ है'

रामविलास पासवान मागील एक महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये अॅडमिट होते. एम्समध्ये २ ऑक्टोबरच्या रात्री त्यांच्यावर हार्ट सर्जरी झाली होती. ही पासवान यांची दुसरी हार्ट सर्जरी होती. यापूर्वी त्यांची एक बायपास सर्जरी झाली होती.

बिहारच्या राजकारणातली महत्त्वाची व्यक्ती आणि केंद्रीय पातळीवर किंगमेकर ठरलेले रामविलास पासवान यांनी २०१९ मध्येच निवडणूक राजकारणातली ५० वर्षं पूर्ण केली होती. आता बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकांआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.



हेही वाचा

मराठा आरक्षणावर सरकारचा वेळकाढूपणा, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

एक राजा बिनडोक तर दुसरा…, प्रकाश आंबेडकरांचं उदयराजेंवर टीकास्त्र

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा