Advertisement

सेन्सेक्सने केला नवा उच्चांक, पोहोचला 'इतक्या' अंकांवर

मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात सेन्सेक्सचा हा विक्रमी उच्चांक आहे. याआधी मागील आठवड्यात गुरूवारी सेन्सेक्सने ४० हजार ३९२ वर जाऊन नवीन विक्रम केला होता.

सेन्सेक्सने केला नवा उच्चांक, पोहोचला 'इतक्या' अंकांवर
SHARES

मुंबई शेअर बाजार रोज नवीन विक्रम करत आहे. सोमवारीही मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने नवीन विक्रम केला आहे. दुपारी सेन्सेक्सने ४० हजार ४८३ अंकांची विक्रमी पातळी गाठली. मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात सेन्सेक्सचा हा विक्रमी उच्चांक आहे. याआधी मागील आठवड्यात गुरूवारी सेन्सेक्सने ४० हजार ३९२ वर जाऊन नवीन विक्रम केला होता. 

सोमवारी शेअर बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी दिसून आली. दिवाळीपासून आतापर्यंत शेअर बाजारात एकही दिवस घसरण झाली नाही. सोमवारीही सेन्सेक्सची सुरूवात तेजीने झाली. त्यानंतर दुपारी अडीच वाजल्यानंतर सेन्सेक्सने आतापर्यंतचा विक्रम केला. दिवसाअखेरीस सेन्सेक्स १३६ अंकाने वाढून ४० हजार ३०१ वर बंद झाला. तर निफ्टीही ५० अंकांची वाढ नोंदवत ११ हजार ९४१ वर स्थिरावला. 

मागील सात सत्रांमध्ये सेन्सेक्समध्ये एकूण १३०७.५९ अंकांची वाढ झाली आहे. २४ आॅक्टोबरला सेन्सेक्स किरकोळ घसरणीने बंद झाला होता. मात्र, त्यानंतरच्या एका सत्रातही सेन्सेक्स घसरला नाही. सोमवारी इन्फोसिसमध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. वेदांता,  ओएनजीसी, टाटा स्टील, एचडीएफसी आदी शेअर्स वधारले. तर मारूती सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, हिंदुस्तान युनीलिवर आणि इंडसइंड बँक आदींचे शेअर्स घसरले. हेही वाचा -

बेरोजगारांसाठी खूशखबर, पोस्टात 'एवढ्या' पदांसाठी भरती

५ वर्षात बँकांच्या 'इतक्या' शाखा झाल्या बंद
संबंधित विषय
Advertisement