Advertisement

सलग ५ व्या दिवशी सेन्सेक्स नव्या उच्चांकावर

हेवीवेट शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीने शुक्रवारी सेन्सेक्स सलग ५ व्या दिवशी नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

सलग ५ व्या दिवशी सेन्सेक्स नव्या उच्चांकावर
SHARES

जून तिमाहीत कंपन्यांचे चांगले तिमाही निकाल अाल्याने शुक्रवारी देशातील शेअर बाजार नव्या उच्चांकावर बंद झाले. अायटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, अायसीअायसीअाय बँक अाणि एचडीएफसी बँक या हेवीवेट शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीने शुक्रवारी सेन्सेक्स सलग ५ व्या दिवशी नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचला. सेन्सेक्स ३५२ अंकांनी वधारून ३७ हजार ३३७ वर बंद झाला. सेन्सेक्सचा हा नवीन विक्रम अाहे.


निफ्टी प्रथमच ११,२०० च्या वर

शुक्रवारी निफ्टीने  प्रथमच ११,२०० ची पातळी ओलांडली. दिवसभरात निफ्टी ११,२८३.५० च्या नवीन उच्चांकावर पोहोचला. दिवसाअखेर १११ अंकांची वाढ नोंदवत तो ११,२७८.३५ वर स्थिरावला. याअगोदर २९ जानेवारी २०१८ ला निफ्टीने ११,१७१.५५ ची विक्रमी पातळी गाठली होती.

५ दिवस सेन्सेक्सचा विक्रम

२७ जुलै  - ३७,३६८.६२ चा नवा उच्चांक
२६ जुलै  - ३७,०६१.६२ चा विक्रमी उच्चांक
२५ जुलै  - ३६,९४७.१८ चा उच्चांक
२४ जुलै  - ३६,९०२.०६ च्या पातळीवर
२३ जुलै  - ३६,७४९.६९ या विक्रमी पातळीवर



हेही वाचा - 

२७ जुलैपासून फ्रीज, टीव्ही, वाॅशिंग मशीन होणार स्वस्त

मास्टर-ब्लास्टरचं एमआयजी काॅलनीत सेकंड होम




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा