Advertisement

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ३००० पोस्ट डिलीट - मुंबई पोलिस

जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबईत सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे.

जातीय तेढ निर्माण करणाऱ्या ३००० पोस्ट डिलीट - मुंबई पोलिस
(File Image)
SHARES

राज्यासह देशातीस सध्या परिस्थिती पाहता समाजकटंकाकड़ून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलीस या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले आहेत. जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबईत सोशल मीडिया लॅब सक्रिय करण्यात आली आहे.

आक्षेपार्ह पोस्टवर मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत जातीय तेढ निर्माण करु शकणाऱ्या सुमारे ३००० पोस्ट डिलीट केल्या आहेत.

महाराष्ट्रात रामनवमीपासून काही ठिकाणी हिंसाचार उसळला होता. याप्रकरणी मुंबईत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा मानखुर्द पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. तर दुसरा गुन्हा मालवणी पोलीस ठाण्यात, तिसरा गुन्हा कुरारा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

तसंच गोरेगावच्या आरे कॉलनीत एकूण तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मानखुर्द घटनेत पोलिसांकडून आतापर्यंत ३० जणांना अटक करण्यात आली आहे. कुरार प्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली आहे. गोरेगाव प्रकरणी २५ जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी आतापर्यंत ६१ जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, भोंग्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही घेतली आहे. दिलीप वळसे पाटील यांनी यानंतर पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालकांना महत्वाचे आदेश दिले आहेत. मुंबईत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भोंग्यासंदर्भात एकत्रित धोरण ठरवा, असे आदेश दिले आहेत. हे धोरण राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी ठरवावे, असे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे. जातीय तेढ निर्माण केल्यास कठोर कारवाई करावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.हेही वाचा

भोंग्यांबाबत पोलीस प्रमुखांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले 'हे' आदेश

नाशिकमध्ये भोंग्यासाठी परवानगी आवश्यक, सर्वधर्मियांसाठी आदेश जारी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा