Advertisement

सहा तासांनंतर गाडीच्या इंजिनातून मांजरीच्या पिल्लाची सुटका

सायन हॉस्पिटलच्या परिसरात त्यांना आणि आजूबाजूच्या नागरिकांना मांजर ओरडण्याचा आवाज येत होता. त्यावेळी संपुर्ण गाडी तपासल्यानंतर देखील मांजरीचा शोध लागला नाही. पोलिसांनी तब्बल दोन तास मांजरीचा शोध घेतला.

सहा तासांनंतर गाडीच्या इंजिनातून मांजरीच्या पिल्लाची सुटका
SHARES

मुलीचा व्हिसा आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी सुरतचे व्यावसायिक कुटुंबासह गुरुवारी मुंबईत अाले होते. व्हिसाचे काम झाल्यानंतर त्यांनी गाडी सिद्धिविनायकाच्या दिशेनं वळवली. सायन हॉस्पिटलच्या परिसरात आल्यानंतर अचानक मांजरीच्या पिल्लाचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी गाडी थांबवून अावाजाचा शोध घेतला. पण मांजर काही सापडत नव्हते. 


गाडी शोरुमध्ये 

जयेश जयवंत टेलर हे सुरतवरून कुटुंबासह मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार म्हणून तिच्या व्हिसाचे काम करण्यासाठी गुरुवारी मुंबईत अाले होते. शुक्रवारी सकाळी व्हिसाचं काम केल्यानंतर ते  दर्शनासाठी सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी निघाले होते. सायन हॉस्पिटलच्या परिसरात त्यांना आणि आजूबाजूच्या नागरिकांना मांजर ओरडण्याचा आवाज येत होता. त्यावेळी संपुर्ण गाडी तपासल्यानंतर देखील मांजरीचा शोध लागला नाही. पोलिसांनी तब्बल दोन तास मांजरीचा शोध घेतला. पण मांजरीचा पत्ता लागला नाही. त्यावेळी पोलिसांनी गाडी शोरुमध्ये नेली. तिथे गाडी पुर्ण उघडली. यावेळी इंजिनमध्ये मांजरीचे पिल्लू असल्याचे दिसून अाले. इंजिनमधून या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात अाली. 


देवाचेच दर्शन झाले

तब्बल सहा तासांनंतर गाडीच्या इंजिनातून या मांजरीच्या पिल्लाची सुटका झाली. त्यानंतर मांजरीला शोरुमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि प्राणिमित्रांच्या मदतीने प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान समजले की मांजरीच्या अंगाला कोणत्याही प्रकारची जखम झाली नव्हती. त्यामुळं सहा तासांनंतर जीवनदान मिळालेल्या मांजरीच्या पिल्लाला पाहून आम्हाला देवाचेच दर्शन झाले, असे म्हणत जयेश यांनी सिद्धिविनायक मंदिरात न जाता आपले घर गाठले.हेही वाचा - 

गुडन्यूज : गॅस सिलेंडर स्वस्त; विनाअनुदानित सिलेंडर १३३ रूपयांनी स्वस्त

३१ डिसेंबरच्या आत तुमचे ATM कार्ड बदलून घ्या, नाहीतर...
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा